पाटना, 17 मे : बिहारमधील (Bihar News) मोतिहारीमध्ये 3 गोळ्या लागल्यानंतर मालकाला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने 40 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली. इतकच नाही तर जखमी अवस्थेत त्याने गुन्हेगारांचा पाठलागही केला. मात्र ते पळून गेले. स्वत:हा जखमी झाल्यानंतर त्याने आपल्या मालकाच्या जीवाचा विचार केला आणि कार चालवत रुग्णालयात घेऊन गेला. चकीया ओव्हरब्रीजजवळ सोमवारी सायंकाळी बाइकस्वार बदमाशांनी कंत्राटदार जयप्रकाश प्रसाद आणि त्यांचा ड्रायव्हर राधेश्याम कुमारवर फायरिंग केली होती. तीन गोळ्या कंत्राटदाराच्या डोकं, पोटं आणि खांद्याला लागल्या होत्या.
गंभीर अवस्थेत ड्रायव्हरवर उपचार सुरू...
ड्रायव्हर राधेश्यामला तीन गोळ्या लागल्या आहेत. स्वत: जखमी झाल्यानंतर ड्रायव्हर हिंमत सोडली नाही. तो गाडी घेऊन 40 किमी दूर एका नर्सिंग होम पोहोचला. येथे डॉक्टरांनी कंत्राटदार जयप्रकाश याला मृत घोषित केलं. ड्रायव्हरवर उपचार सुरू आहे. लोक त्यांच्या धैर्याचं कौतुक करीत आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आरोपींचा शोध सुरू आहे.
ड्रायव्हरने सांगितला त्याच्यासोबत घडलेला प्रकार
राधेश्यामने सांगितलं की, तो आणि जयप्रकाश पाटन्याला जात होतो. रस्त्यात कंत्राटदाराने चकियामधील आपल्या हॉट मिक्सर प्लांटवर साधारण 1 तास थांबून काम पाहिलं आणि यानंतर ते दोघे पाटन्याच्या दिशेने निघाले. यादरम्यान चकिया ओव्हर ब्रिजजवळ थांबले होते. एका बिरयाणी हाऊसमधून बिरयाणी घेतली आणि गाडीमध्ये बसून खात होते. तेव्हाच काळ्या रंगाच्या बाईकवरुन दोघेजण आले आणि त्यांना गोळीबार केला.
मला काहीच कळत नव्हतं. मालकाच्या शरीर रक्तबंबाळ झालं होतं. त्यात मलाही तीन गोळ्या लागल्या. यानंतरही तो गाडीने बाईकचा पाठलाग करीत होता. यादरम्यान ऑटोने डाव्या बाजूने कट मारला आणि आमच्या गाडीने ऑटोला धडक दिली. आरोपीदेखील खाली पडले. कोणी येण्यापूर्वीच आरोपी पळून गेले. त्याच परिस्थितीत गाडी घेऊन तब्बल 40 किमी दूरपर्यंत मोतिहारी नर्सिंग होमला घेऊन गेले. मात्र तोपर्यंत जयप्रकाश यांचा मृत्यू झाला होता.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.