भोपाळ, 16 मे : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) राजगड जिल्ह्यातील खिलचीपुरजवळील पिपलियाकला गावात काही अज्ञातांनी दलित तरुणाची वरात गावात येण्यास बंदी घातली. याचं कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल. अजूनही देशातील अनेक गावांमध्ये दलितांना दुय्यम (Crime News) वागणूक दिली जाते. या गावकऱ्यांनी सांगितलं की, गावाची जुनी परंपरा आहे, त्यानुसार दलित कुटुंबातील नवरदेव घोडीवर बसू शकत नाही. आता गावकरीच गोळी झाल्याने नवरीशिवायच वरात परतली.
बऱ्याचदा आपल्या चित्रपटांमधून अशा प्रकारची घटना पाहतो. आता आपल्या देशात असं काही होत नाही, असाच सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र दुर्देवाने आजही आपल्या देशांमध्ये दलित नवरदेवाची वरात जाताना त्याला घोडीवर बसण्यास मज्जाव केला जातो. त्या कुटुंबावर केवळ जातीच्या आधारावर बंधनं लादली जातात.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साधारण 10 वाजता, दलित तरुण वरात घेऊन नवरीच्या घरी पोहोचणारचं होतं. यावेळी काही गावकऱ्यांनी तब्बल 5 किलोमीटर आधीच वरात रोखली. दलित नवरदेवाला घोडीवर बसण्यास मज्जाव केला. पोलिसांना याबाबत कळताच ते घटनास्थळी दाखल झाले. मात्र पोलिसांना पाहून गावतील काही अज्ञात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करू लागले. पोलिसांनी अश्रूधुराचा वापर करून जमावावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतर कलेक्टर आणि एसपी फोर्ससह छापीहेडा ते जीरापूर या मार्गाने वरात घेऊन पोहोचले. यानंतर (marriage took place in the presence of the Collector SP ) कलेक्टर-एसपींच्या उपस्थितीत गावात लग्न पार पडलं. यानंतर काही काळ गावात पोलिसांचं दल तैनात होतं. येथे पोलिसांनी 20 लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री शिवजा सिंह यांनी आदिवासी महिलेच्या घरातील बोरं खाल्ली होती. हे तेच गाव आहे, जेथे मुख्यमंत्र्यांनी तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Dalit, Madhya pradesh