Home /News /crime /

भर लग्न मंडपात 'लुडो'चा रक्तरंजित खेळ; चार प्लेअरपैकी एकाची हत्या

भर लग्न मंडपात 'लुडो'चा रक्तरंजित खेळ; चार प्लेअरपैकी एकाची हत्या

लग्न मंडपात मित्र लुडो गेम खेळत होते. मात्र त्या दिवशी असं काही घडलं, की....

    दिसपूर, 16 मे : सध्या मैदानी खेळापेक्षा व्हिडीओ गेम खेळण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. अनेकदा लहान मुलांपासून तरुण मंडळीदेखील व्हिडीओ गेममध्ये मग्न असताना दिसतात. खेळात यश-अपयश होत असतं. मात्र अनेकदा अपयश सहन न झाल्याने मुलं गुन्हेगारीकडे वळतात. अशीच एक घटना आसामच्या (Assam Crime News) उत्तरेकडील लखीमपूर जिल्ह्यातील मोइदुमिया येथून समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका लग्न समारंभात 20 वर्षीय तरुणाला त्याच्याच एका मित्राने लुडो ( ludo game) खेळताना चाकू मारून हत्या केली. इस्सद अली नावाच्या पीडित तरुणावर चाकूने वार करण्यात आले. यानंतर त्याला शेजारील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. (Lost in a ludo game a friend stabbed him to death) अली आणि आरोपी अफजात अलीसोबत पाच जणं लुडो गेम खेळत होते. काही वेळाने इस्सदसोबत खेळावरुन भांडण झालं. अलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला. यादरम्यान सुरक्षा दलाने एका आरोपीला अटक केली आहे. खेळात कोणी हरतं तर कोणी जिंकतं, मात्र अशावेळी अपयशातून जो यश मिळवून दाखवितो, त्यालाच खरं यशस्वी म्हटलं जातं. मात्र ऑनलाइनच्या जगात अशा अनेक घटना घडताता ज्या आपल्या विचार करण्याच्या पलीकडे असतात. लुडो खेळात अपयश आलं म्हणून एकाने आपल्या मित्राची हत्या केली, हे घटना समाजातील अलर्ट देत आहे. वेळीत सावधान होणं गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला योग्य दिशा दाखवणं हे आपलच काम आहे. त्यामुळे ऑनलाइन खेळाचा अतिरेक जीवघेणा ठरू शकतो, हे अनेक प्रकरणातून समोर येत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Assam, Crime, Murder

    पुढील बातम्या