मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आफताबच्या आईवडिलांनाही कल्पना होती, पण.. श्रद्धाच्या मॅनेजरची धक्कादायक माहिती

आफताबच्या आईवडिलांनाही कल्पना होती, पण.. श्रद्धाच्या मॅनेजरची धक्कादायक माहिती

श्रद्धाच्या मॅनेजरची धक्कादायक माहिती

श्रद्धाच्या मॅनेजरची धक्कादायक माहिती

श्रद्धा वालकरच्या मॅनेजरने धक्कादायक माहिती दिली असून आफताबच्या आईवडिलांनाही याची कल्पना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 नोव्हेंबर : श्रद्धा वालकरच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी दिल्ली पोलीस रात्रंदिवस तपास करताना दिसत आहेत. या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता श्रद्धा वालकरच्या मॅनेजरने तिच्या संदर्भात धक्कादायक माहिती उघड केली आहे. परिणामी आता पोलिसांना या प्रकरणात नवीन दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

श्रद्धा वालकरचा मॅनेजर काय म्हणाला?

मार्च 2020 ते 2021 पर्यंत श्रद्धा माझ्या टीममध्ये होती. श्रध्दा सुरवातीला खूप चंचल आणि बडबडी होती, काही दिवसांनी मला श्रद्धाची एक वेगळी बाजू लक्षात आली की ती जवळजवळ प्रत्येक महिन्यात 4-5 दिवस रजा घेऊ लागली. कारण विचारले असता, तब्बेत ठिक नसल्याचं सांगायची. दोनवेळा तिच्या अंगावर जखमा असल्याचे आम्ही पाहिले. नोव्हेंबर 2020 मध्ये श्रद्धाने पहिल्यांदा माझ्यासमोर घरगुती हिंसाचाराचा उल्लेख केला. त्यावेळी तिने मला एक फोटो पाठवला ज्यामध्ये तिच्या उजव्या डोळ्याजवळ निळ्या रंगाची निळी खूण होती. आफताबने तिला वाईटरित्या मारल्याचे यातून दिसत होतं. त्याशिवाय श्रद्धाच्या गालावर जखमा होत्या. त्याने तिचा गळा दाबून मारहाण केली होती.

वाचा - श्रद्धा वालकर हत्याकांड; पोलिसांच्या हाती लागलं महत्त्वाचं CCTV फुटेज, आफताबचं 'ते' कृत्य कॅमेऱ्यात कैद

जेव्हा तिने मला तो फोटो पाठवला तेव्हा मला काळजी वाटली. मी वसईत राहणारा माझा मित्र गॉडविनला फोन केला. श्रद्धाला गॉडविनकडे पाठवलं आणि महिला मंडळाची मदत घेऊन पोलिसात तक्रार केली. मात्र, त्याआधी आफताबने श्रद्धाला सांगितले की, जर श्रद्धाने तक्रार केली तर तो आत्महत्या करेल. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनीही श्रद्धाला आश्वासन दिलं की ते जिथं लिव्ह-इनमध्ये राहत आहे, तिथून निघून जाईल. आफताबच्या आई-वडिलांना श्रद्धाच्या भांडणाची माहिती असल्याचा दावाही मॅनेजरने केली आहे.

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक

दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला श्रद्धा वालकरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूनावाला याने 18 मे रोजी संध्याकाळी श्रद्धा वालकर (27) हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, जे त्याने दक्षिण दिल्लीतील मेहरौली येथील त्याच्या निवासस्थानी सुमारे तीन आठवडे 300 लिटरच्या फ्रीजमध्ये ठेवले. श्रद्धाचे शरीराच्या तुकड्यांची तो अनेक दिवस दिल्लीच्या विविध भागात विल्हेवाट लावत होता.

First published:

Tags: Crime, Vasai