बीड, 16 नोव्हेंबर : बीडमध्ये (Beed) प्रेयसीवर अॅसिड (acid attack) आणि पेट्रोल टाकून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणी मुख्य आरोपी अविनाश राजुरेला अटक केल्यानंतर बीड पोलिसांच्या (Beed Police) स्वाधीन करण्यात आले होते. आज न्यायालयात हजर केले असता 8 दिवसांची पोलीस कोठडी ( police custody) देण्यात आली आहे. लवकरच हत्येचा कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
अॅसिड व पेट्रोल जळीत प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश राजुरेला शनिवारी नांदेडमधील देवलूर परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते. आज बीड जिल्हा सत्र न्यायालयात दुपारी 12.30 वाजता अविनाशला हजर केले असता 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. जिल्हा सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्याय दण्डाधिकारी कदिर अहम्मद न सरवरी यांच्यासह दिवाणी न्यायधीश यांनी 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. हत्या का केली, हेतू काय होता आणि या प्रकरणात आणखी कोण सहभागी आहे का ? हा तपास बाकी असल्यामुळे 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
‘तुम्ही शूटिंगला गेला आहात असंच वाटतं’ इरफान खानच्या मुलाची भावनिक पोस्ट
न्यायालयात दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाच्या दंडाधिकारी यांनी आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती विभागीय पोलीस भास्कर सावंत यांनी दिली. आरोपीने गुन्हा कबूल केला असून पुढील तपास सुरू आहे, असंही त्यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22) तरुणीचं याच गावातील अविनाश राजुरे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. गेल्या काही दिवसांपासून दोघेही जण पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते.
तिकडे शिवम दुबेनं फटाके फोडले, इकडे ट्रोल झाला कॅप्टन कोहली; वाचा काय आहे प्रकरण
पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा -केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या अविनाशने रस्त्याच्या बाजूला अगोदर सावित्रावर अॅसिड टाकले. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून सावित्राला पेटवून दिले. तरुणीला पेटवून दिल्यानंतर अविनाश घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासात आरोपी अविनाशला अटक करण्यात आली होती.