‘तुम्ही शूटिंगला गेला आहात असंच वाटतं’ इरफान खानच्या मुलाची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

‘तुम्ही शूटिंगला गेला आहात असंच वाटतं’ इरफान खानच्या मुलाची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

अभिनेता इरफान खानच्या (Irrfan Khan) मुलाने वडिलांचा एक फोटो शेअर करत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. बाबिल म्हणतो, ‘तुम्ही लाँग शूटला गेला आहात असंच वाटतं.’

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan)चं निधन होऊन 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. पण त्याचं कुटुंब अद्यापही दु:खामधून बाहेर आलेलं नाही. इरफान खानचा मुलगा बाबिल खान (Irrfan Khan's Son Babil Khan) सोशल मीडियावर त्याच्या वडिलांबाबत अनेकदा पोस्ट शेअर करतो. इरफानचे कटुंबासोबतचे काही फोटो, काही आठवणी चाहत्यांना सांगत असतो. काही दिवसांपूर्वीच इरफान खानने त्यांच्या वडिलांच्या कबरीची एक पोस्ट शेअर केली होती. आता बाबिलने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

बाबिलने काय पोस्ट केली?

बाबिलने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यात इरफानने हातामध्ये मोर धरला आहे असं दिसत आहे. फोटोखाली बाबिलने कॅप्शन दिलं आहे की, ‘रूह बनकर मिलूंगा उसको आसमां में कहीं, प्यार धरती पर फरिश्तों से किया नहीं जाता.’ इरफानच्याच रोग या सिनेमातल्या या ओळी आहेत. पुढे बाबिल म्हणतो, मला अजूनही असं वाटतं की तुम्ही एखाद्या लाँग शूटिंगसाठी गेला आहात. आणि काही दिवसांनी माझ्याकडे परत याल.'

View this post on Instagram

A post shared by Babil (@babil.i.k)

बाबिल खानने शेअर केलेली ही पोस्ट पाहून त्यांचे चाहतेदेखील हळहळले. इरफान खानसारख्या गुणी अभिनेत्याचं निधन काळजाला चटका लावून जाणारं होतं. एखाद्या पठडीतल्या हिरोसारखा चेहरा इरफानकडे नव्हता. पण तरीही त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याने अनेकांची मनं जिंकली आहेत.

Published by: Amruta Abhyankar
First published: November 16, 2020, 1:55 PM IST
Tags: viral post

ताज्या बातम्या