जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / साखरपुड्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार; तरुणाचं होणाऱ्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, पोलीसही हादरले

साखरपुड्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार; तरुणाचं होणाऱ्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, पोलीसही हादरले

संपादित छायाचित्र

संपादित छायाचित्र

साखरपुडा झाल्यानंतर तरुणीने लग्नाला नकार दिल्यानं आरोपीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. या प्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

दिल्ली, 9 फेब्रुवारी : तरुणीने लग्नाला नकार दिल्यानं तिच्या होणाऱ्या नवऱ्यानं तरुणीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. तरुणानं दारूच्या नशेत तरुणीचा गळा आवळून तिच्या हत्येचा प्रयत्न केला. या घटनेत संबंधित तरुणी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर तरुणीला तशाच अवस्थेमध्ये सोडून आरोपीने पळ काढला. जखमी तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मेरठमधील घटना घटनेबाबत अधिक माहिती अशी की ही घटना उत्तर प्रदेशातल्या मेरठमधील आहे. मेरठमधील एका तरुणीचा साखरपुडा झाला होता. मात्र साखरपुडा झाल्यानंतर ज्या तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला आहे, त्या तरुणाला दारूचे व्यसन असल्याचं या तरुणीला कळालं. यानंतर या तरुणीने लग्नाला नकार दिला. याचा राग अनावर झाल्यानं आरोपीने आपल्या मित्रासोबत तरुणीच्या घरात घुसून तिचा गळा आवळला. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. मात्र तिने आरडाओरड केल्यानं आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. हेही वाचा :  औरंगाबादेत केमिकलचा भीषण स्फोट; घर कोसळून एक ठार, 3 जखमी आरोपीविरोधात गुन्हा दाखल घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी आणि त्याच्या मित्रांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात