कल्याण, 09 फेब्रुवारी : मुंबई जवळील कल्याण परिसरामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एवढच नाहीतर पहिला अधिकाऱ्याची हत्या करून तो दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याची हत्या करायला निघाला होता. मात्र कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी त्याला आधीच अटक केली. धक्कादायक म्हणजे, हत्या करणारा दुसरा तिसरा कुणी नसून तो देखील पोलीसच आहे. रेल्वेचे आर.पी.एफचे सह पोलीस निरीक्षक बसवराज गर्ग यांची रेल्वे आर.पी.एफचा जवान पंकज यादव यांने हत्या केली. कल्याणच्या रेल्वे बॅरॅकमध्ये रात्री उशिरा ही हत्या करण्यात आली. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अवघ्या ४ तासात आरोपी पंकजला अटक केली आहे. आरपीएफचे अधिकारी बसवराज आणि पंकज यादव हे काही वर्षांपूर्वी कल्याणच्या रेल्वे पोलिसात एकत्र काम करत होते. त्यावेळेस पंकजचे तिथल्या एका पोलिसाशी भांडण झालं होते. यात पंकज यादवची अंतर्गत बसवराज गर्ग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी सुरू होती. यात पंकजचे वेतनामधील इन्क्रिमेंट त्याचबरोबर बेसिक पेमेंट कमी झाल्याची शिक्षा त्याला झाली. (साखरपुड्यानंतर तरुणीचा लग्नाला नकार; तरुणाचं होणाऱ्या पत्नीसोबत धक्कादायक कृत्य, पोलीसही हादरले) मात्र केवळ या अधिकाऱ्यांच्या चौकशीमुळे आपले नुकसान झाल्याचा राग पंकजच्या मनात होता. याच रागातून त्याने रात्री उशिरा बसवराज राहत असलेल्या कल्याणच्या बॅरेकमध्ये जाऊन त्यांच्याशी वाद घातला आणि त्यांच्या डोक्यात लाकडी दांडकाने प्रहार करत त्यांची हत्या केली. ( नातवांना खेळवायच्या 78 वर्षीय आजोबांना डेटिंगचा नाद, तब्बल 1 कोटींना लागला चुना ) एवढंच नाहीतर, खाते अंतर्गत चौकशी करणारा बर्वे नावाचाा पोलीस अधिकारी होताा. त्यांची सुद्धा हत्या करण्यासाठी तो चिपळूणला निघाला होता. मात्र कोळशेवाडी पोलिसांनी त्याला पेनमधून आधीच अटक केली. दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास कोळशेवाडी पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.