• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • रस्त्यावरच नवजात 'नकोशी'ला सोडून अज्ञाताचा पोबारा; बुलडाण्यातील घटनेनं खळबळ

रस्त्यावरच नवजात 'नकोशी'ला सोडून अज्ञाताचा पोबारा; बुलडाण्यातील घटनेनं खळबळ

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

एक हादरवणारी घटना बुलडाण्यातून (Buldana News) समोर आली आहे. यात एका व्यक्तीनं स्त्री जातीचे जिवंत अर्भक (Female Infant) रस्त्यावर टाकून पोबारा केला आहे.

  • Share this:
राहुल खंडारे, बुलडाणा 28 ऑगस्ट : आजकाल जग पुढे जात असून मुलीदेखील कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. तसंच मुली आणि मुलांमध्ये आता भेदभावही केला जात नाही आणि प्रत्येक क्षेत्रात आणि कामात त्यांना समान संधी दिली जाते, असे शब्द आपण अनेकदा आजूबाजूला असलेल्या लोकांकडून ऐकत असतो. मात्र, समाजाच्या काही भागांमध्ये असेही लोक आहेत जे अजूनही मुलींना ओझं समजतात. अशीच एक हादरवणारी घटना बुलडाण्यातून (Buldana News) समोर आली आहे. यात एका व्यक्तीनं स्त्री जातीचे जिवंत अर्भक (Female Infant) रस्त्यावर टाकून पोबारा केला आहे. एक चापट अन् 7 सेकंदात 7 लाखांवर मारला डल्ला; लुटीचा थरारक VIDEO आला समोर ही घटना बुलडाणा जिल्ह्यातील जामोदा सूनगाव रस्त्यावरील आहे. यात अज्ञात व्यक्तीनं ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये स्त्री जातीचं जिवंत अर्भक टाकून पोबारा केला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अर्भकाला आता उपचारासाठी जळगाव (Jalgaon) येथील एका रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. पोलीस (Police) सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. 'कार हळू चालव' म्हटल्यानं तरुणाची सटकली; हत्येच्या थरारक घटनेनं औरंगाबाद हादरलं हे अर्भक याठिकाणी कोणी आणून टाकलं? त्याचे जन्मदाते नेमके कोण आहेत, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हे अर्भक अनैतिक संबंधातून जन्माला आलं आहे का, या बाजूनंही पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या या प्रकरणी अधिक माहिती समोर आलेली नाही. मात्र, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अशा पद्धतीनं जिवंत अर्भक आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.
Published by:Kiran Pharate
First published: