मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

'कार हळू चालव' म्हटल्यानं तरुणाची सटकली; हत्येच्या थरारक घटनेनं औरंगाबाद हादरलं

'कार हळू चालव' म्हटल्यानं तरुणाची सटकली; हत्येच्या थरारक घटनेनं औरंगाबाद हादरलं

Crime in Aurangabad: घरासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कारने कट मारल्यानं 'कार हळू चालव' अशी समज दिल्याचा कार चालकाला भलताच राग आला आहे.

Crime in Aurangabad: घरासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कारने कट मारल्यानं 'कार हळू चालव' अशी समज दिल्याचा कार चालकाला भलताच राग आला आहे.

Crime in Aurangabad: घरासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कारने कट मारल्यानं 'कार हळू चालव' अशी समज दिल्याचा कार चालकाला भलताच राग आला आहे.

  • Published by:  News18 Desk

औरंगाबाद, 28 ऑगस्ट: एखाद्या व्यक्तीला कधी आणि कोणत्या कारणावरून येईल हे काही सांगता येत नाही. घरासमोर उभ्या असणाऱ्या व्यक्तीला कारने कट मारल्यानं 'कार हळू चालव' (suggest to drive slow) अशी समज दिल्याचा एका तरुणाला भलताच राग आला आहे. या रागाच्या भरात आरोपीनं आपल्या दोन भावांसोबत मिळून एका व्यक्तीची हत्या (Murder in Aurangabad) केली आहे. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याच्या दोन भावांना अटक (3 Accused Arrested) केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मोहंमद शफियोद्दीन अब्दुल रेहमान असं हत्या झालेल्या 50 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. तर सादीक ऊर्फ मुन्नाजान मोहंमद (वय-28), शेख जावेदजान मोहंमद शेख (वय-32) आणि शेख अथर जाफर बेग (वय-38) असं अटक केलेल्या तीन आरोपींनीची नावं आहेत. आरोपी सादीक हा गुरुवारी मध्यरात्री आपल्या कारने वेगानं जात होता. दरम्यान त्यानं आपल्या घरासमोर उभ्या असलेल्या मोहंमद रेहमान यांना कारने कट मारला.

हेही वाचा-तू गट्ट्या आव्हाळेला नडतो काय? विचारत तरुणावर कोयत्यानं केले वार; पुण्यातील घटना

यामुळे घाबरलेल्या रेहमान यांनी कारचालक सादीकला 'कार हळू चालव' अशी समज दिली. याचा राग आल्यानं सादीकनं रेहमान यांच्याशी रस्त्यावरचं वाद घातला. पण तेथील काही लोकांनी मध्यस्थी करत दोघांचा वाद मिटवला. यानंतर सादीक तेथून निघून गेला. पण घरी गेल्यानंतर त्यानं त्याच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर सादीकचे नातेवाईक शेख जावेदजान, मोहंमद शेख आणि अथर शेख पुन्हा घटनास्थळी आहे.

हेही वाचा-...म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना

यावेळी आरोपींनी शफियोद्दीन याना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात शफियोद्दीन रक्तबंबाळ झाले. या घटनेनंतर काही नागरिकांनी त्यांना अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना औरंगाबादला नेण्याचा सल्ला देण्यात आला. पण वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. या प्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास अजिंठा पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime news, Murder