जाहिरात
मराठी बातम्या / देश / एक चापट अन् 7 सेकंदात 7 लाखांवर मारला डल्ला; लुटीचा थरारक VIDEO आला समोर

एक चापट अन् 7 सेकंदात 7 लाखांवर मारला डल्ला; लुटीचा थरारक VIDEO आला समोर

दुकानात शिरलेल्या काही पाच जणांनी अवघ्या सात सेंकदाच्या आत दुकानातील 7 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.

दुकानात शिरलेल्या काही पाच जणांनी अवघ्या सात सेंकदाच्या आत दुकानातील 7 लाख रुपयांवर डल्ला मारला आहे.

Robbery Video: दुकानात शिरलेल्या काही पाच जणांनी अवघ्या सात सेंकदाच्या आत दुकानातील 7 लाख रुपयांवर डल्ला (Theft 7 lakh in 7 second) मारला आहे. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पाटण, 28 ऑगस्ट: अवघ्या काही सेकंदात सात लाख रुपयांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. मालक आणि कर्मचारी दुकानात बसून पैसे मोजत असताना दुकानात शिरलेल्या काही पाच जणांनी अवघ्या सात सेंकदाच्या आत दुकानातील 7 लाख रुपयांवर डल्ला (Theft 7 lakh in 7 second) मारला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. लुटीच्या या थरारक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना गुजरात राज्याच्या पाटण येथील हारिज बाजार परिसरातील आहे. येथील एका आंगडिया पीढीच्या दुकानात काहीजणांनी बंदुकीच्या धाकानं दुकानातील 7 लाख रुपयांची पिशवी लांबवली आहे. अवघ्या काही सेकंदात आरोपींनी एवढी मोठी चोरी केली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पाहून पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची सुत्रं हलवली आहेत. ही दरोडा नेमका कुणी टाकला याबाबत पोलिसांकडे अद्याप कोणतीही माहिती नसून पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. हेही वाचा- …म्हणून बहिणीच्या प्रियकराचा केला खेळ खल्लास; महाराष्ट्राला हादरवणारी घटना नेमकं काय घडलं? आंगडिया पीढीचे मालक आणि त्यांचे कर्मचारी दुकानात बसून पैसे मोजत होते. दरम्यान दुकानात पाच जणांनी बंदुक घेऊन प्रवेश केला. तसेच दुकानात फोनवर बोलणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकावून घेण्याचाही प्रयत्न केला. दुकानात शिरलेल्या पाच जणांनी बंदुकीच्या धाकानं दुकानातील 7 लाख रुपयांनी भरलेली पिशवी लंपास केली आहे. भामट्यांनी अवघ्या सात सेकंदात हा गुन्हा आटोपला आहे.

जाहिरात

हेही वाचा- ‘कार हळू चालव’ म्हटल्यानं तरुणाची सटकली; हत्येच्या थरारक घटनेनं औरंगाबाद हादरलं आरोपींच्या हातात बंदुक असल्यानं कुणीही त्यांना विरोधही केला नाही. एका व्यक्तीनं पैशानं भरलेली बॅग लपवण्याचा प्रयत्न केला असता. दरोडेखानं एक चापट लावून त्याच्या हातातील बॅग हिसकावली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात