• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • विकृत! BOUNCER ने पैशांसाठी केलं कोट्यधीश तरुणीशी अफेअर, सेक्स करताना केला खून

विकृत! BOUNCER ने पैशांसाठी केलं कोट्यधीश तरुणीशी अफेअर, सेक्स करताना केला खून

एका बाऊन्सरनं पैशांसाठी आपल्या गर्लफ्रेंडचा (Bouncer murdered his girlfriend while having sex) खून केल्याची घटना समोर आली आहे.

 • Share this:
  बर्न, 21 सप्टेंबर : एका बाऊन्सरनं पैशांसाठी आपल्या गर्लफ्रेंडचा (Bouncer murdered his girlfriend while having sex) खून केल्याची घटना समोर आली आहे. आपली गर्लफ्रेंड कोट्यधीश बापाची (Rich father's daughter) मुलगी आहे, हे लक्षात आल्यावर तिच्याकडून पैसे उकळण्याच्या प्लॅन या तरुणानं आखला. तिच्यासोबत सेक्स करताना तिचा गळा आवळून त्याने खून केला आणि तिच्याजवळचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केला. अशी घडली घटना स्वित्झर्लंडमधील ब्रिटीश तरुणी एना रिड हिचे जर्मन बॉयफ्रेंड मार्क शेजलसोबत प्रेमसंबंध होते. ‘द सन’नं दिलेल्या बातमीनुसार हे दोघं एका हॉटेलमध्ये थांबले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची एकमेकांशी ओळख झाली होती आणि एनाचे वडिल कोट्यधीश असल्याचं शेजलला समजलं होतं. एनाच्या खात्यावरही लाखो रुपये असल्याची माहिती त्याला तिच्याशी बोलताना समजली होती. शेजलवर 40 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज होतं आणि हे कर्ज फेडण्यासाठी एनाचे पैसे घेण्याचा त्याचा इरादा होता. असा केला खून हॉटेलच्या रुममध्ये सेक्स करत असतानाच त्याने एनाला गळा दाबून खून केला. एनाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या असून तिची हाडंदेखील मोडल्याचं तपासात दिसून आलं आहे. शेजलनं स्वतःच डॉक्टरांना फोन करून एनाच्या मृत्यूची बातमी दिली आणि सेक्स करताना अचानक तिचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी मृतदेहाचं पोस्टमार्टेम केलं आणि सत्य समोर आलं. हे वाचा - आंतरजातीय विवाह योजनेचा गैरफायदा, पैसे मिळवण्यासाठी केलं लग्न कोर्टातील निकालाची अपेक्षा 2019 साली घडलेल्या या घटनेचा निकाल काही दिवसांतच लागणं अपेक्षित आहे. शेजल आणि एनाच्या खोलीतून भांडणांचे आणि वस्तू फेकल्याचे आवाज येत असल्याची साक्ष त्यांच्या शेजारच्या खोलीत राहणाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी न्यायालय काय शिक्षा सुनावतं, याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
  Published by:desk news
  First published: