Home /News /crime /

आंतरजातीय विवाह योजनेचा गैरफायदा, पैसे मिळवण्यासाठी केलं लग्न; बलात्कार करून काढलं घराबाहेर

आंतरजातीय विवाह योजनेचा गैरफायदा, पैसे मिळवण्यासाठी केलं लग्न; बलात्कार करून काढलं घराबाहेर

सरकारनं विषमता संपवण्यासाठी सुरु केलेल्या आंतरजातीय विवाह योजनेचा (Marriage just to get money from inter-cast marriage scheme) गैरफायदा घेत एका तरुणानं तरुणीशी लग्न केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार (Rape) करून तिला हाकलून दिलं.

    जयपूर, 21 सप्टेंबर : सरकारनं विषमता संपवण्यासाठी सुरु केलेल्या आंतरजातीय विवाह योजनेचा (Marriage just to get money from inter-cast marriage scheme) गैरफायदा घेत एका तरुणानं तरुणीशी लग्न केले आणि नंतर तिच्यावर बलात्कार (Rape) करून तिला हाकलून दिले. आंतरजातीय विवाह केल्यानंतर सरकारकडून मिळणाऱ्या 5 लाख रुपयांच्या (Government Scheme) अमिषाने या तरुणाने इतर जातीतील तरुणीशी विवाह करण्याची योजना आखली. तरुणीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर तिने पोलिसांत गुन्हा (Case filled) नोंदवला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप काहीही कारवाई केली नसल्याची तक्रार तिने माध्यमांकडे केली आहे. असे झाले लग्न राजस्थानच्या चुरू भागात राहणाऱ्या निकेश जाट नावाच्या तरुणानं अनुसुचित जातीच्या मुलीशी लग्न केलं. या तरुणाची लग्नाअगोदर तरुणीशी तोंडओळख होती. तरुणाने गोड बोलून तरुणीला दिल्लीला नेलं. तिथं तिच्यासोबत लग्न रजिस्टर केलं. त्यानंतर तिच्याशी जबरदस्तीनं शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. आपण पैशांसाठी लग्न केल्याचं समजलं तर पोलिसांना ससेमिरा मागे लागेल, या भीतीने तो पत्नीला गावीदेखील घेऊन आला. गावी आल्यावर मात्र त्याने तिला घरातून हाकलून दिले. तरुणीने दिली तक्रार तरुणीने तक्रार केली तर सरकारकडून पैसे मिळणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर त्याने तरुणीला विकण्याची धमकी दिली. आपल्याला 5 लाख रुपये दिले नाहीत, तर आपण तरुणीला विकून टाकू, असा निरोप त्याने तरुणीच्या कुटुंबीयांना पाठवला. तरुणीने आणि तिच्या कुटुंबीयांनी याविरोधातही तक्रार केली आहे. मात्र ही तक्रार मागे घ्यावी, यासाठी सातत्याने निकेश जाट आणि त्याच्या कुटुंबीयांकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. हे वाचा - ड्रग्ज न मिळाल्याने 3 मुलींच्या बापाची आत्महत्या, डोक्यात झाडून घेतली गोळी तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न तरुणीने या सर्व प्रकाराला वैतागून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अगोदर तिने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्यानंतर उंदीर मारण्याचं औषध घेतलं. त्यामुळे तिची तब्येत बिघडल्यानंतर नातेवाईकांनी तिला रुग्णालयात दाखल केलं. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तक्रार करूनही पोलीस दखल घेत नसल्यामुळे आणि सतत तक्रार मागे घेण्याचा दबाव येत असल्यामुळे आपण आत्महत्येचं पाऊल उचलल्याची माहिती तिने दिली. पोलिसांनी या नराधम तरुणाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Marriage, Rajasthan, Rape

    पुढील बातम्या