जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / आधी संमतीने ठेवले संबंध; मग पैशाची मागणी, जीवे मारण्याची धमकी अन्.., पुण्यातील व्यावसायिकासोबत विचित्र प्रकार

आधी संमतीने ठेवले संबंध; मग पैशाची मागणी, जीवे मारण्याची धमकी अन्.., पुण्यातील व्यावसायिकासोबत विचित्र प्रकार

आधी संमतीने ठेवले संबंध; मग पैशाची मागणी, जीवे मारण्याची धमकी अन्.., पुण्यातील व्यावसायिकासोबत विचित्र प्रकार

पीडित व्यक्तीने तक्रारीत म्हटलं आहे की, तो जानेवारी महिन्यात कोरेगाव भीमा येथील एका लॉजवर गेला होता, तिथे त्याने संबंधित महिलेचा नंबर घेतला. त्याने तिच्याशी संपर्क साधला असता तिने त्याला कोंढवा येथील खादी मशीन चौकात येण्यास सांगितलं.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे 30 जुलै : एका 26 वर्षीय व्यावसायिकाने एका महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर दोन व्यक्तींनी त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. त्यांनी व्यावसायिकाला ही तरुणी अल्पवयीन असल्याचं सांगून बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आणि 67 लाख रुपये उकळले. पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. याप्रकरणी हडपसरचे रहिवासी चेतन हिंगमिरे (वय 35) आणि निखिल म्हेत्रे (28) यांना अटक करण्यात आली असून लावण्या पाटील ही महिला फरार आहे. पीडित व्यक्तीने तक्रारीत म्हटलं आहे की, तो जानेवारी महिन्यात कोरेगाव भीमा येथील एका लॉजवर गेला होता, तिथे त्याने संबंधित महिलेचा नंबर घेतला. त्याने तिच्याशी संपर्क साधला असता तिने त्याला कोंढवा येथील खादी मशीन चौकात येण्यास सांगितलं. त्यानंतर दोघांनी बोपदेव घाटात जाऊन शारीरिक संबंध ठेवले. सुरुवातीला महिलेने त्याच्याकडून 10 हजार रुपये घेतले. बापरे! अंबरनाथमध्ये भर दिवसा रहदारीच्या रस्त्यावर राडा, गोळीबार-मारहाण सीसीटीव्हीत कैद, पाहा थरारक VIDEO नंतर पीडित व्यक्तीने महिलेला इतर वेळीही भेटून पैसे दिले. 31 जानेवारी 2022 रोजी महिलेने त्याच्याकडे मोपेड खरेदी करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्या व्यक्तीने तिला 25,000 रुपये दिले. फेब्रुवारीमध्ये, पीडित व्यक्तीला महिलेचा फोन आला की ती गरोदर आहे आणि तिच्या होणाऱ्या पतीने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर महिला आणि हिंगमिरे यांनी पीडित व्यक्तीची भेट घेऊन त्याच्याकडून पैसे उकळले. पीडित व्यक्तीने मोबाईल पेमेंट सेवेद्वारे त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले. मार्चमध्ये, दोघांनी पुन्हा व्यावसायिकाशी संपर्क साधला आणि सांगितलं की त्यांनी वानवरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यावर पुन्हा एकदा त्या पीडित व्यक्तीने पैसे दिले. एप्रिलमध्ये, गुन्हेगारांनी त्याला पुन्हा फोन केला, पोलीस त्याला कधीही अटक करू शकतात, अशी धमकी दिली आणि निखिल म्हेत्रेच्या खात्यात पैसे जमा करण्यास भाग पाडले. महिला त्याचे नग्न फोटो सोशल मीडियावर टाकणार असल्याचे आरोपीने सांगितल्यानं त्याचा त्रास वाढतच गेला. नंतर पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिली. वंशाच्या दिव्यासाठी मुलींसमोर आईला पेटवलं, पोरींच्या लढ्यामुळे बापाला घडली जन्माची अद्दल या टोळीने त्याच्याकडून एकूण 67.7 लाख रुपये उकळले. अखेर तक्रारदाराने गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेने हिंगमिरे आणि म्हेत्रे यांना अटक केली असून महिला फरार आहे. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मिररला सांगितलं, “न्यायालयाने हिंगमिरे आणि म्हेत्रे यांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. हिंगमिरे याच्यावर चोरी, दरोडा, फसवणूक आणि बनावटगिरीच्या आठ गुन्ह्यांची नोंद आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात