मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

वंशाच्या दिव्यासाठी मुलींसमोर आईला पेटवलं, पोरींच्या लढ्यामुळे बापाला घडली जन्माची अद्दल

वंशाच्या दिव्यासाठी मुलींसमोर आईला पेटवलं, पोरींच्या लढ्यामुळे बापाला घडली जन्माची अद्दल

वंशाला दिवा हवा म्हणून वडिलांनी आईला जिवंत जाळताना (man burnt his wife alive) मुलींनी पाहिलं. या घटनेनंतर दोन्ही मुलींनी मोठं धैर्य दाखवत बापाला अद्दल घडवली आहे.

वंशाला दिवा हवा म्हणून वडिलांनी आईला जिवंत जाळताना (man burnt his wife alive) मुलींनी पाहिलं. या घटनेनंतर दोन्ही मुलींनी मोठं धैर्य दाखवत बापाला अद्दल घडवली आहे.

वंशाला दिवा हवा म्हणून वडिलांनी आईला जिवंत जाळताना (man burnt his wife alive) मुलींनी पाहिलं. या घटनेनंतर दोन्ही मुलींनी मोठं धैर्य दाखवत बापाला अद्दल घडवली आहे.

मुंबई, 29 जुलै :  मुलगा-मुलगी एकसमान असं म्हटलं जात असलं तरी आजही मुलगाच हवा असा दुराग्रह अनेकजण करतात. इतकंच नाही तर मुलाच्या हट्टापायी मुलींना गर्भातच जीवे मारलं जातं. पण उत्तर प्रदेशात बुलंदशहरामध्ये मुलाच्या हट्टापायी बायकोला जिवंत (man burnt his wife alive) जाळण्यात आलं. आपली आई जिवंत जळताना तिच्या मुलींनी प्रत्यक्ष पाहिलं. अखेर बायकोला जिवंत जाळल्याच्या आरोपाखाली या नराधमाला जन्मठेप (Life Imprisonment) आणि 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तब्बल सहा वर्षं या मृत महिलेच्या मुली आणि कुटुंबीय या न्यायासाठी झगडत होते. 'न्यूज 7 नोएडा' या वेबसाईटने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

काय आहे प्रकरण?

14 जून 2016 रोजी बुलंदशहर पोलिसांमध्ये (Bulandshahar Police) ओमवती देवी म्हणजेच मृत महिलेच्या आईने तक्रार दाखल केली, असं फिर्यादीचे वकील संजय शर्मा आणि राजीव मलिक यांनी सांगितलं. 2000 साली आपली मुलगी अन्नू हिचं लग्न बुलंदशहर कोठियात राहणाऱ्या मनोजशी झालं. त्यानंतर अन्नूला लतिका आणि तान्या या दोन मुली झाल्या. मात्र मनोजला मुलगाच हवा होता. मुलगा व्हावा यासाठी त्यानं अन्नूला खूप त्रास दिला. इतकंच नाही तर अन्नू गर्भवती असताना लिंगचाचणी करून पाच वेळा तिचा गर्भपातही मनोजनं करायला लावला होता, असंही ओमवती यांनी सांगितल्याची माहिती राजीव यांनी दिली.

13 जून रोजी राजीवनं फोन करून आम्हाला बोलावलं असं वकीलांनी सांगितलं.जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा अन्नूला तुम्ही बरोबर घेऊन जा असं मनोजनं सांगितलं. याला नकार दिला तेव्हा आपण अन्नूला मारून टाकू असं मनोज म्हणाला होता, असंही वकीलांनी सांगितलं. 14 जूनच्या सकाळी नाती लतिका बन्सलनं फोन करून सांगितलं की तिच्या आईला तिचे वडील आणि अन्य काही लोकांनी मिळून जिवंत जाळलं आहे. घटनास्थळी जाऊन पाहिल्यावर अन्नू अत्यंत वाईट पद्धतीने जळालेल्या अवस्थेत अंगणात पडलेली होती असं भयानक चित्र दिसलं. तिला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला हायर सेंटरमध्ये जाण्यासाठी सांगण्यात आलं. उपचारादरम्यान 20 जून रोजी अन्नूचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी खूनाच्या आरोपाखाली तक्रार दाखल करून घेतली होती.

एकाच घरात आढळले कुटुंबातील चौघांचे मृतदेह; मुंबईतील घटनेनं खळबळ

या तक्रारीनंतरही आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. आरोपी मनोजला अटक व्हावी यासाठी अन्नूच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे कित्येक हेलपाटे मारले. तरीही काहीही उपयोग झाला नाही. अधिकारी दखल घेण्यासच तयार नव्हते. जवळपास दोन महिने पोलिसांनी चालढकल केली. अखेर वैतागून अन्नूच्या मुली लतिका आणि तान्या बन्सलनं कुटुंबीयांसह तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव (Former CM Akhilesh Yadav) यांना रक्ताने पत्र लिहिलं. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं. तेव्हा अखिलेश यादव यांनी या मुलींना भेटायला लखनौला बोलावलं. त्यानंतर या पीडित कुटुंबाला 10 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि निष्पक्ष तपासाचं आश्वासनही दिलं होतं. आता अखेर सहा वर्षांनी अतिरिक्त सत्र न्यायालय विवेक कुमार यांच्या कोर्टाने आरोपी मनोज याला दोषी ठरवलं आणि जन्मठेप व 20 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

मुलींनी घडवली बापाला अद्दल

या सगळ्या प्रकरणात अन्नूच्या मुली तान्या आणि लतिका यांनी मोठ्या धीराने झुंज दिली. वकील संजय शर्मा यांनी आपलं कौतुक केल्याचं अन्नू बन्सल हिची मोठी मुलगी लतिकानं बुधवारी (27 जुलै 22) सांगितलं. त्यांनी आपल्याला त्यांच्या मुलींप्रमाणे सांभाळलं आणि धीर दिला, आम्हाला न्याय मिळेल यासाठी सतत प्रयत्न केलं असंही लतिकानं सांगितलं. ही घटना घडली त्या दिवशी दोन्ही बहिणींना एक रुममध्ये कोंडून ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर आपल्या वडिलांनी आईला जाळलं. वडिलांनी आईला जाळल्याचं आणि आई जळत असल्याचं आपण खिडकीतून पाहत होतो, पण काहीही करू शकलो नाही लतिकानं सांगितलं. ती घटना या मुलींच्या डोळ्यांसमोरून अर्थातच जाणं शक्य नाही. त्यामुळेच आईसाठी या मुलींनी सतत सहा वर्षे लढा दिला.

Beed : मुलांवर लक्ष आहे ना? ग्रामीण भागातील विद्यार्थीही Child Pornography च्या जाळ्यात, VIDEO

अन्नूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी जो रिपोर्ट दाखल केला त्यात खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला तेव्हा मात्र मनोजच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. खरं तर आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. पण तपासादरम्यान त्यातील सात जणांची नावं पोलिसांनी काढून टाकली. अखेरीस या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपासाधिकारी कमलेश शुक्ला यांना हटवण्यात आलं. त्यानंतर कोर्टानं पुराव्यांच्या आधारे हा खटला खुनाच्या आरोपाखाली नव्याने चालवण्याचे आदेश दिले. यामध्ये अन्नूच्या दोन्ही मुली लतिका आणि तान्या यांना साक्षीदार करण्यात आलं. त्यानंतर वकीलांनी कोर्टात पुरावे आणि प्रत्यक्ष साक्षीदार सादर केले. या सगळ्यांच्या आधारावर मनोजला आपल्या बायकोला जिवंत जाळल्याच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

First published:

Tags: Crime news, Uttar pardesh