दोन लेडीज बारसह एकूण 5 बार सील, ठाणे पालिकेची धडक कारवाई

दोन लेडीज बारसह एकूण 5 बार सील, ठाणे पालिकेची धडक कारवाई

कोरोना काळात नियमांचे पालन न केल्याने ठाण्यातील शिल्पा बार आणि रेस्टॉरंटसह 5 बारला रात्री सील ठोकले.

  • Share this:

ठाणे, 23 फेब्रुवारी : सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायझर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंट बारवर ठाणे महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करून सील केले आहे. महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करून नये, मास्क वापरण्यासोबत सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक करण्याचे तसंच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापना तात्काळ सील करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दोनच दिवसांपूर्वी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पथकाने धाडी टाकून ही कारवाई केली.

या कारवाईतंर्गत नौपाडा प्रभाग समिती आणि माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्ग दोन लेडीज बारसह एकूण पाच बारवर धडक कारवाई करण्यात आली. नौपाडा प्रभाग समितीमधील एलबीएस रोडवरील शिल्पा बार हा लेडीज बार उपायुक्त(अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे यांनी सील केला.

त्याचबरोबर माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतंर्गत कापूरबावडू येथील सन सिटी या लेडीजबारसह हिरानंदानी इस्टेटमधील टीआरपी लाऊंज, पोप टेटस् आणि मायझो हे तीन बार  उपायुक्त(अतिक्रमण) अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त अनुराधा बाबर यांनी सील केले. दरम्यान, या पाचही आस्थापनांवर महापालिका आयुक्तांनी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही आस्थापनांची गय केली जाणार नाही असा इशारा महापालिका आयुक्त डॅा. विपीन शर्मा यांनी दिला आहे.

ए....मंग्या...निगकी भाइर..; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची हुबेहुब मिमिक्री

कोरोना काळात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन न केल्याने ठाण्यातील शिल्पा बार आणि रेस्टॉरंट सह ५ बारला ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी रात्री सील ठोकले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व हॉटेल्स ना एकूण क्षमतेच्या केवळ 50 टक्के ग्राहकांना आत घेण्याची परवानगी दिलेली असताना सदर बारमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती. सदर बार हा ठाण्यातील गजबजलेल्या आराधना सिनेमा समोर स्थित असून, लेडीज बार असल्याने इथे नेहमीच अशाप्रकारे नियमांची पायमल्ली करत गर्दी होत असते. याची माहिती मिळताच पालिका उपायुक्त अशोक बुरपुल्ले, सहाय्यक आयुक्त प्रणाली घोंगे आणि कर्मचाऱ्यानी आज अचानक भेट दिली असता दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त ग्राहक बसलेले आढळले. पालिका उपायुक्तांनी तात्काळ कारवाई करत सदर हॉटेलला सील ठोकून कारवाई केली.

Published by: sachin Salve
First published: February 23, 2021, 5:47 PM IST

ताज्या बातम्या