Home /News /entertainment /

ए....मंग्या...निगकी भाइर..; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची हुबेहुब मिमिक्री

ए....मंग्या...निगकी भाइर..; पाहा तुमच्या आवडत्या अभिनेत्रींची हुबेहुब मिमिक्री

या व्हिडीओमध्ये तिनं एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात अभिनेत्रींच्या आवाजात सैराट चित्रपटातील एक डायलॉग उच्चारला आहे. या व्हिडीओमधील पूजाची मिमिक्री पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल या अभिनेत्रीचा खरा आवाज आहे तरी कसा?

  मुंबई 23 फेब्रुवारी : पूजा सदामते (Dr Pooja Sadamate Nagaral) हिला सोशल मीडियावरील मिमिक्री क्वीन असं म्हटलं जातं. अभिनेत्री कंगना रणौत ते उषा नाडकर्णींपर्यंत कोणाचेही आवाज काढून प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणाऱ्या या अभिनेत्रीचा एक थक्क करणारा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तिनं एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात अभिनेत्रींच्या आवाजात सैराट चित्रपटातील एक डायलॉग उच्चारला आहे. या व्हिडीओमधील पूजाची मिमिक्री पाहून तुम्हाला देखील प्रश्न पडेल या अभिनेत्रीचा खरा आवाज आहे तरी कसा? पूजानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिनं रिंकू राजगुरु, मुक्ता बर्वे, सोनाली कुलकर्णी, शुभांगी गोखले, तेजश्री पंडित, सई ताम्हणकर आणि उषा नाडकर्णी या अभिनेत्रींचे हुबेहुब आवाज काढले आहेत. (Rinku Rajguru, Mukta Barve, Sonali Kulkarni, Shubhangi Gokhale, Tejashree Pandit, Sai Tamhankar and Usha Nadkarni) या सर्व अभिनेत्रींच्या शैलीत तिनं सैराट चित्रपटातील “मराठीत सांगितलेलं कळत नाही का? इंलिशमध्ये सांगू काय” हा सुपरहिट डायलॉग उच्चारला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत पूजाच्या अभिनयशैलीचं कौतुक केलं आहे.
  'त्यांना याची किंमत मोजावी लागेल'; आत्महत्येच्या बातमीमुळं संतापला अध्ययन सुमन पूजा सदामते ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. रंगभूमीवर प्रायोगिक नाटकं करत तिनं आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. चला हवा येऊ द्या या प्रसिद्ध शोनं आयोजित केलेल्या होऊ द्या व्हायरल या स्पर्धेत ती उपविजेता ठरली होती. त्यानंतर ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. अभिनयासोबतची रेडियोवर आर. जे. म्हणून देखील काम करते. जबरदस्त मिमिक्री स्किलमुळं तिला सोशल मीडियावरील मिमित्री क्वीन असं म्हटलं जातं.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Entertainment, Rinku rajguru, Social media, Social media viral, Sonali kulkarni

  पुढील बातम्या