मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

हनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ'

हनीमूनआधी सासूने केली सूनेची कौमार्य चाचणी, नवरा म्हणाला 'लक्ष नको देऊ'

या महिलेचा असा आरोप आहे की, तिची सासू आणि मेहुण्यानं हनीमूनआधी तिची कौमार्याची परीक्षा घेतली. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मोठ्या दीराने शारीरिक संबंध ठेवले आणि धमकावून शांत केलं.

  • Published by:  Renuka Dhaybar

इंदूर, 08 मार्च : 30 वर्षीय महिलेने आपल्या पती, सासू आणि सासर्‍यावर कौमार्य चाचणी, बलात्कार आणि हुंड्याचा छळ केल्याचा गंभीर आरोप केला. या महिलेचा असा आरोप आहे की, तिची सासू आणि मेहुण्यानं हनीमूनआधी तिची कौमार्याची परीक्षा घेतली. लग्नाच्या पाच महिन्यांनंतर मोठ्या दीराने शारीरिक संबंध ठेवले आणि धमकावून शांत केलं. पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यानुसार, कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

द्वारकापुरी पोलीस ठाण्याचे टीआय संजय शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, देवास येथील रहिवासी असलेल्या या महिलेचं 4 मे 2017 रोजी लग्न झालं होतं. 28 ऑक्टोबर 2017 रोजी आरोपीनं केलेल्या अत्याचाराला कंटाळून ती तिच्या पालकांकडे गेली. घटनेची आठवण करुन ती रात्रंदिवस रडायची. त्याची प्रकृती पाहून पालक निराश झाले. 3 फेब्रुवारी रोजी वडिलांनी शपथ घातली आणि सगळं प्रकरण विचारलं त्यानंतर तिने कुटुंबाला सर्व प्रकार सांगितला. पीडित महिलेने सांगितले की, हनीमूनच्या पूर्वसंध्येला सासू आणि मेहूणे तिच्याकडे आले होते.

हे वाचा - पत्नीची हत्या करून पोलिसांत केला चौथा पती, सांगितलं धक्कादायक सत्य

तिला जबरदस्तीने बाथरूममध्ये नेलं आणि खासगी भागांची चाचणी केली. जेव्हा तिने ही घटना आपल्या पतीला सांगितली तेव्हा पतीने तिला लक्ष न देण्यास सांगितलं. पीडित महिलेने सांगितलं की, दीर चहा देताना तिचा हात धरायचा. 27 ऑक्टोबर रोजी सासूने तिला खोली साफ करण्याच्या बहाण्यानं बेडरूममध्ये पाठविलं. काही वेळानं दीर आला आणि त्यानं तिला धमकावून तिच्यावर बलात्कार केला.

सासू म्हणाली, 'ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. तू खूप भाग्यवान आहेस की तू माझ्या दोन्ही मुलांना आवडतेस. 28 ऑक्टोबरला पतीने तिला धमकावून तिच्या माहेरी पाठवलं. टीआयच्या म्हणण्यानुसार पीडितेने आरोपीवर हुंडा मागितल्याचा आरोपही केला. या सगळ्या अत्याचारामुळे पीडित अतिशय चिंतेत होती.

हे वाचा - असा दिसतो कोरोनाव्हायरस! चीनच्या शास्त्रज्ञांनी शेअर केला पहिला फोटो

तिच्यावर मानसिक आणि शारीरिक दबाव टाकल्यामुळे ती आजारी पडत होती. पण पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असून पीडितेवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

First published: