मुंबई, 8 फेब्रुवारी : पॉर्न फिल्म बनवण्याच्या आरोपाखाली मुंबई क्राईम ब्रांचने शुक्रवारी पाच लोकांना अटक केली आहे. आता चौकशीदरम्यान याबाबत आणखी काही गोष्टींचा खुलासा झाला आहे. या चौकशीत काही मॉडेल्सची नावंही समोर आली आहेत. नावं समोर आलेल्या मॉडेल्सशी संपर्क करण्यात आला असून क्राईम ब्रांचचा तपास बॉलिवूडपर्यंतही जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात ज्यावेळी बॉलिवूड, टीव्ही मालिकांचं शूटिंग बंद होतं, त्यावेळी पॉर्न फिल्मचं शूटिंग सुरू होतं. हे संपूर्ण शूटिंग मालाडच्या मड आयलँडमधील बंद बंगल्यांमध्ये होत होतं. कोरोना काळात पोलिसांचं संपूर्ण लक्ष कोरोनाविरोधातील लढाईकडे तसंच जनतेच्या सेवेकडे होतं. त्यामुळे या बंद बंगल्यांमध्ये नेमकं काय सुरू आहे, याबाबत कोणतीही माहिती समजू शकली नाही. आरोपींनी त्याचाच फायदा घेतल्याचं आता समोर आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वत: अनेक अॅप्सही तयार केले आहेत. ज्याचे लाखो ग्राहक होते. त्या अॅप्सवर आरोपी पॉर्न फिल्म अपलोड करत असल्याची माहिती मिळत आहे. हे अॅप्स ओपन करण्यापूर्वी ग्राहकांना सब्सक्रिप्शन फी भरावी लागत होती. एका महिन्यासाठी 199 रुपये, तीन महिन्यासाठी 499 रुपये आणि 999 रुपये वर्षभरासाठी अशी या अॅप्सची सब्सक्रिप्शन फी होती.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रोया खान उर्फ यास्मीन नावाची महिला या रॅकेटचा मुख्य भाग होती. चौकशीवेळी तिने आतापर्यंत 50 हून अधिक पॉर्न फिल्म बनवल्याचं सांगितलं. ती स्वत: व्यावसायाने फोटोग्राफर आहे. अटक करण्यात आलेली दुसरी महिला प्रतिभा पॉर्न फिल्मची प्रोडक्शन इंचार्ज आणि ग्राफिक डिझायनरही होती. तीन पुरूषांना यात कॅमेरा, लाईटमॅन आणि ऍक्टिंगचं काम देण्यात आलं होतं.
आरोपींच्या चौकशीदरम्यान आणखी एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या गोरेगाव आणि इतर ठिकाणांवरही शनिवारी शोध घेण्यात आला. पोलिसांच्या टीमला डायलॉग लिहिलेल्या काही स्क्रिप्टही मिळाल्या आहेत. तसंच सहा मोबाईल फोन, एक लॅपटॉप, लाईट स्टँड आणि कॅमेरासह एकूण 5 लाख 68 हजारांचं सामान जप्त करण्यात आलं आहे.
तसंच सर्व आरोपींच्या बँक अकाउंट्सटीही चौकशी करण्यात येत आहे. क्राईम ब्रांचने आतापर्यंत 36 लाख रुपये जप्त केले आहेत. ज्या महिलांद्वारे पॉर्न फिल्मचं शूटिंग केलं जात होतं, त्यांना 20 मिनिटांच्या या फिल्मसाठी 30 हजार रुपये दिले जात असल्याचीही माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Mumbai News, Mumbai police