मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Gehana Vasisth मुंबई पोलिसांच्या ताब्यात, पॉर्न व्हिडिओ रॅकेटचं आहे प्रकरण

Gehana Vasisth मुंबई पोलिसांच्या ताब्यात, पॉर्न व्हिडिओ रॅकेटचं आहे प्रकरण

गहनाचं स्वतःच प्रोडक्शन(Production House) हाऊस होतं. याठिकाणी वेबसीरिज आणि मालिकेच्या नावावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ शूट केले जात होते आणि ते अपलोड केले जात होते.

गहनाचं स्वतःच प्रोडक्शन(Production House) हाऊस होतं. याठिकाणी वेबसीरिज आणि मालिकेच्या नावावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ शूट केले जात होते आणि ते अपलोड केले जात होते.

गहनाचं स्वतःच प्रोडक्शन(Production House) हाऊस होतं. याठिकाणी वेबसीरिज आणि मालिकेच्या नावावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ शूट केले जात होते आणि ते अपलोड केले जात होते.

मुंबई 7 फेब्रुवारी : पॉर्नोग्राफिक व्हिडिओ प्रकरणी मुंबई क्राईम ब्रान्चनं मोठी कारवाई केली आहे. ऑल्ट बालाजीची अडल्ट सीरिज गंदी बातमध्ये (Gandii Baat) झळकलेली अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिला मुंबई क्राईम ब्रांचच्या (Mumbai Crime Branch) प्रॉपर्टी सेलनं ताब्यात घेतलं आहे. गहनावर आपल्या वेबसाईटसाठी पॉर्न व्हिडिओ शूट करून अपलोड करण्याचा आरोप आहे. तिला आज मुंबईच्या एका न्यायालयात हजर केलं जाईल. पोलीस सध्या इतर कलाकार, मॉडेल आणि प्रोडक्शन हाऊसचाही तपास करत आहेत. यांच्यावर अॅडल्ट फिल्म मोबाईल अॅप आणि वेबसाईटवर अपलोड करण्याचा आरोप आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास वेगानं सुरू केला आहे. मिस एशिया बिकनीचा मान पटकवणारी गहना वशिष्ठनं हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केलं आहे. वेबसाईटवर अश्लील कंटेट अपलोड करण्याबाबत शनिवारी दुपारी गहनाची चौकशी केली गेली होती.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गहनाचं स्वतःच प्रोडक्शन हाऊस होतं. याठिकाणी वेबसीरिज आणि मालिकेच्या नावावर पॉर्नोग्राफी व्हिडिओ शूट केले जात होते आणि ते अपलोड केले जात होते. याप्रकरणी क्राईम ब्रांचनं आतापर्यंत 5 जणांना अटक केली आहे. गहनासह अटक करण्यात आलेल्या लोकांची संख्या 6 आहे.

एका माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी 87 आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ शूट करून आपल्या बेवसाईटवर अपलोड केले आहेत. या वेबसाईटचा कंटेट पाहाण्यासाठी सब्सस्क्रीप्शनची गरज पडते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सब्सस्क्रीप्शनसाठी 2 हजार रुपये भरावे लागत होते. या माध्यमातून गहना आणि तिची टीम भरपूर पैसे कमवत होती.

या वेबसाईटविरोधात 3 लोकांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचा असा आरोप होता, की त्यांच्याकडून जबरदस्तीनं पॉर्न फिल्ममध्ये काम करून घेतलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रॉपर्टी सेलनं मलाडमधील मड आयलँड येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली. यावेळी 6 जणांना ताब्यात घेण्यात आलं.

First published:
top videos

    Tags: Porn star