नवी दिल्ली 15 जानेवारी : चोरीची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. यात मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी दागिन्यांच्या शोरूममध्ये प्रवेश करून एका मिनिटापेक्षा कमी वेळात 16 कोटी रुपयांचे दागिने लंपास केले. चोरट्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने हातोडे घेऊन दुकानात प्रवेश केला होता. या चोरट्यांनी दुकानात घुसून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि चोरी केली. गर्लफ्रेंडला भेटायला जाण्यासाठी नव्हते पैसे; अल्पवयीन मुलाने मोठं कांड करून 20 लाख मिळवले, पण… ही घटना 8 जानेवारी रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील पार्क स्लोप भागात घडली. तीन मुखवटा घातलेल्या चोरट्यांनी हातोडे घेऊन शोरूममध्ये प्रवेश केला आणि काचा फोडल्या. या डिस्प्लेमध्येच दागिने ठेवण्यात आले होते. यानंतर या चोरांनी तिथे उपस्थित लोकांना जीवे मारण्याची धमकी दिली. दुकानाच्या मालक इरिना सुले यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला सांगितलं की, खरे सांगायचं तर हे सर्व खूप भीतीदायक होतं. अवघ्या 38 सेकंदात सर्व काही घडलं. त्यांनी सुमारे 100 अंगठ्या आणि इतर दागिने नेले, ज्याची किंमत सुमारे 16 कोटी रुपये आहे. इरीनाने सांगितलं की, कोणते दागिन्यांचे बॉक्स उचलायचे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. कारण, त्यांनी फक्त मोठ्या पेट्याच चोरल्या. इरीनाने सांगितलं की, जेव्हा तीन चोर शोरूममध्ये घुसले तेव्हा ती एका ग्राहकाला दागिने दाखवत होती. हे लोक आत येताच त्यांनी हातोड्याने डिस्प्ले तोडण्यास सुरुवात केली. एका कर्मचाऱ्याने फोन काढून मला देण्याचा प्रयत्न केला, मात्र एका चोरट्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. बरमोडा घालून चोरी करणं पडलं महागात, अखेर बाटलीसह फुटला भांडा, चोरीचा Video Viral लुटमार केल्यानंतर तिघेही दागिने घेऊन पळून गेले. मात्र, लुटमारीच्या घटनेत कोणीही जखमी झालं नाही. या घटनेनं ग्राहक आणि कर्मचारी सर्वच हैराण झाले होते. त्याचवेळी इरिनाने न्यूयॉर्क पोलीस विभागाला या भागात गस्त वाढवण्याची विनंती आहे. इरिना म्हणाली की ती प्रार्थना करत आहे की पोलिसांनी चोरांना पकडावं. तिने सांगितलं की, या घटनेनंतर ती इतकी घाबरली आहे की, दुकानात येणाऱ्या नियमित ग्राहकांसाठीही ती आता दरवाजा उघडण्यास टाळाटाळ करत आहे. स्टोअरमध्ये काम करणाऱ्या गिना टरीगोनं सांगितलं की, ती अनेक दशकांनंतर इतकी घाबरली होती, ‘मी 70-80 च्या दशकापासून न्यूयॉर्कमध्ये राहते, पण मला कधीही इतकं असुरक्षित वाटलं नाही’ असंही ती म्हणाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.