जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादमध्ये विकृतीचा कळस, लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला

औरंगाबादमध्ये विकृतीचा कळस, लुटमार करुन वृद्धेवर बलात्कार, नंतर पोलिसांवर हल्ला

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माला तडा जाईल अशी धक्कादायक आणि प्रचंड विचित्र घटना घडली आहे. एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत आधी लुटलं. त्यानंतर त्याने वृद्धेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

  • -MIN READ Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, औरंगाबाद, 5 ऑक्टोबर : ज्येष्ठ नागरिकांचा आपण आदर करतो. ज्येष्ठ नागरीक म्हणजे समाजाला दिशा देणारे गुरुच. त्यांना आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले असतात. त्याच अनुभवाच्या आधारावर समाजात एक पिढी घडते. त्यामुळे ज्येष्ठांचा आपण नेहमी सन्मान करतो. पण औरंगाबादमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सन्माला तडा जाईल अशी धक्कादायक आणि प्रचंड विचित्र घटना घडली आहे. एका सराईत चोरट्याने एका ज्येष्ठ महिलेला चाकूचा धाक दाखवत आधी लुटलं. त्यानंतर त्याने वृद्धेवर बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलिसांवरही चाकू हल्ला केला. पण पोलीस त्यातून सुखरुप बचावले. संबंधित घटना ही औरंगाबादच्या वाळूज औद्योगिक परिसरात घडली आहे. आरोपीने वृद्धेला आधी चाकूचा धाक दाखवला. त्याने महिलेकडे पैशांची मागणी केली. चाकूचा धाक दाखवत त्याने वृद्धेकडे पैसे आणि दागिने लुटले. त्यानंतर आरोपीने वृद्धेसोबत अतिशय घृणास्पद कृत्य केलं. आरोपीने विकृतीचा कळस गाठत वृद्ध महिलेवर बलात्कार केला. आरोपीच्या या कृत्यामुळे वृद्ध महिला मनातून खचली आहे. संबंधित घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. ( VIDEO : किती भयानक आहे हे सगळं! मुंबईत चोरटे बिनधास्त घरात शिरतात, आणि… ) पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीची हिंमत इतकी मोठी की त्याने पोलिसांवर थेट चाकू हल्ला केला. यावेळी पोलीस आणि आरोपी यांच्यात चांगलीच धक्काबुक्की झाली. अखेर आरोपीच्या नांग्या ठेचण्यात पोलिसांना यश आलं. शक्तुर लष्करी भोसले असे आरोपीचे नाव आहे. संबंधित घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याविरोधाच विविध कलमांतर्गत 7 गुन्हे दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे. दुसरीकडे आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शहरातील अनेक नागरिकांनी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Rape
  • First Published :
जाहिरात
जाहिरात