जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / अंधश्रद्धेतून धक्कादायक कांड; अल्पवयीन मुलाचं शीर धडावेगळं करून मृतदेहाचे तुकडे केले, असा झाला खुलासा

अंधश्रद्धेतून धक्कादायक कांड; अल्पवयीन मुलाचं शीर धडावेगळं करून मृतदेहाचे तुकडे केले, असा झाला खुलासा

अंधश्रद्धेतून धक्कादायक कांड; अल्पवयीन मुलाचं शीर धडावेगळं करून मृतदेहाचे तुकडे केले, असा झाला खुलासा

एका 9 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. यानंतर संपत्ती मिळविण्यासाठी मानवी बळीच्या विधीसाठी त्याचं शीर कापण्यात आलं. यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सिलवासा 13 जानेवारी : गुन्हेगारी च्या हादरवणाऱ्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता दादरा आणि नगर हवेलीमधून समोर आली आहे. यात एका 9 वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं. यानंतर संपत्ती मिळविण्यासाठी मानवी बलीच्या विधीसाठी त्याचं शीर कापण्यात आलं. यावेळी त्याच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाचा खळबळजनक खुलासा केला. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी 100 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील वापी येथे कालव्याजवळ शिरच्छेद केलेला मृतदेह सापडल्यानंतर गेल्या आठवड्यात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आणि एका किशोरवयीन मुलाला ताब्यात घेतलं होतं. कंझावाला प्रकरणात मोठी अपडेट; आरोपींबाबत गृहमंत्रालयाकडून महत्त्वाचे निर्देश, पोलिसांवरही कारवाईच्या सूचना पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक जारी करत म्हटलं, की केंद्रशासित प्रदेशातील दादरा आणि नगर हवेली (DNH) जिल्ह्यातील सायली गावातून २९ डिसेंबर रोजी एक नऊ वर्षांचा मुलगा बेपत्ता झाला होता. यानंतर 30 डिसेंबर रोजी सिलवासा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सांगितलं की, मुलाचा शोध घेण्यासाठी अनेक पथकं तयार करण्यात आली. नंतर या मुलाच्या वर्णनाप्रमाणंच डोके नसलेलं शरीर DNH चे जिल्हा मुख्यालय असलेल्या सिलवासापासून 30 किमी अंतरावर असलेल्या वापी येथे आढळलं.

News18लोकमत
News18लोकमत

एका अधिकाऱ्याने सांगितलं की, वापी येथील कालव्याजवळ मृतदेह सापडला, तर सायली गावात मृतदेहाचे काही भाग आढळून आले, जिथे मानवी बळीचा विधी करण्यात आला होता. मृतदेहाचे अवयव फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की, तपासात पोलीस एका अल्पवयीन मुलापर्यंत पोहोचले. त्याने उघड केलं की त्याने 29 डिसेंबर 2022 रोजी सायली गावातून पीडित मुलाचं अपहरण केलं आणि आपल्या साथीदाराच्या मदतीने मानवी बळी म्हणून त्याची हत्या केली. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलाच्या चौकशीतून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात पोलिसांना मदत झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी सांगितलं की, ताब्यात घेतलेल्या मुलाने उघड केलं की त्याचा मित्र शैलेश कोहकेरा (28) याने पीडित मुलाची हत्या करण्यात मदत केली होती. रमेश सांवर हा देखील या कटाचा एक भाग असल्याचं त्याने सांगितलं. सांवरने अल्पवयीन मुलगा आणि शैलेश कोहकेरा यांना आर्थिक फायद्याच्या लालसेपोटी मानव बळी विधी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर कोहकेरा आणि सांवर यांचा शोध घेऊन ३ जानेवारीला अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, अल्पवयीन आरोपी सायली गावात एका चिकन शॉपमध्ये कसाई म्हणून काम करत होता. तो गुजरातमधील तापी जिल्ह्यातील कपराडा तालुक्यातील करजन गावचा रहिवासी आहे. त्याला सुरतच्या निरीक्षण गृहात पाठवण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात