जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं

पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं

पाकिस्तानात हिंदू महिलेची निर्घृण हत्या; सामूहिक बलात्कारानंतर कातडी सोलून शीर धडावेगळं केलं

या महिलचं डोकं धडावेगळं केलेलं होतं. तिचे स्तन कापण्यात आले होते. तसंच, तिच्या चेहऱ्यावरची आणि शरीरावरची त्वचाही सोलून काढण्यात आली होती.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    कराची 29 डिसेंबर : पाकिस्तानच्या सिंझोरो गावात एका हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करून शिरच्छेद झाल्याची घटना बुधवारी (28 डिसेंबर) उघडकीस आली आहे. दया भील असं त्या 40 वर्षीय महिलेचं नाव होतं. या महिलचं डोकं धडावेगळं केलेलं होतं. तिचे स्तन कापण्यात आले होते. तसंच, तिच्या चेहऱ्यावरची आणि शरीरावरची त्वचाही सोलून काढण्यात आली होती. ‘इंडिया टुडे’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या महिलेला चार मुलं आहेत. द पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या नेत्या आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला हिंदू खासदार कृष्णा कुमारी यांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी पीडितेच्या गावात जाऊन तिच्या कुटुंबीयांची, तसंच गावकऱ्यांची भेट घेतली. आधी अपहरण करुन अत्याचार; नंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सामूहिक बलात्कार पाकिस्तान पीपल्स पार्टीचे जियाला अमर लाल भील यांनी असा दावा केला, की या महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह बुधवारी एका शेतात सापडला. पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आलं असून, अधिक तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं.

    जाहिरात

    कृष्णा कुमारी यांनी मृत महिलेच्या गावाला भेट देऊन चर्चा केली. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलं आहे, ‘दया भील या 40 वर्षांच्या विधवा हिंदू महिलेची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह अत्यंत वाईट स्थितीत आढळला. तिचं डोकं धडावेगळं झालेलं होतं. तिच्या डोक्यातलं सगळं मांस बाहेर आलेलं होतं. सिंझोरो आणि शाहपूरचकर या दोन्ही ठिकाणचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मीदेखील तिच्या गावाला भेट दिली.’ दरम्यान, ‘जागरण’ने दिलेल्या वृत्तातल्या माहितीनुसार, संबंधित महिलेची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा शिरच्छेद करण्यात आला. तसंच, तिचे स्तन कापून टाकण्यात आले. एवढं झाल्यानंतरही हे कृत्य करणाऱ्यांचं समाधान न झाल्याने नंतर तिची त्वचाही सोलण्यात आली होती. अत्यंत हादरवून टाकणाऱ्या या हत्येमुळे पाकिस्तानात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: crime , Murder
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात