नवी दिल्ली 16 ऑगस्ट : आई-वडील आपल्या मुलांच्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतात. मुलांना प्रत्येक सुख मिळावं आणि ते सुरक्षित राहावेत, यासाठी आई-वडील आयुष्यभर प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा थोडंसं दुर्लक्ष होतं आणि मोठी दुर्घटना घडते. अशीच एक घटना यूक्रेनमधून (Ukrain) समोर आली आहे. या घटनेत एक दोन वर्षाची मुलगी उकळत्या पाण्यात पडली (2 Years Girl Burnt In Boiling Water). यात ती गंभीर जखमी झाली आणि नंतर तिचा मृत्यूही झाला.
Shocking! मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं
एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईचं नाव डॅरिना तर वडिलांचं नाव इवान आहे. मुलगी लेस्याच्या मृत्यूनंतर पोलीस या दोघांचीही चौकशी करत आहेत. ही घटना यूक्रेनच्या Grygorivka गावात घडली आहे. पोलीस चौकशीत मुलीच्या आईनं सांगितलं, की चिकन शिजवण्यासाठी त्यांनी किचनमध्ये गॅसवर एका भांड्यात पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं. नंतर काहीतरी कामासाठी ती किचनच्या बाहेर आली. दहा मिनिटांनंतर ती जेव्हा किचनमध्ये पुन्हा गेली तेव्हा तिनं पाहिलं की तिची मुलगी लेस्या उकळत्या पाण्यात कोसळली होती आणि वाईट पद्धतीनं जळाली होती.
मोठी दुर्घटना : तब्बल 38 प्रवाशांच्या बोटीला विजेचा झटका; 4 जणं बेपत्ता
तपासात असं समोर आलं, की या घटनेनंतर आई-वडिलांनी या मुलीला रुग्णालयात नेलं नाही तर एका साध्या डॉक्टरकडे नेलं. मात्र, प्रकृती जास्त गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, लेस्या तब्बल दहा दिवस रुग्णालयात अॅडमिट होती, मात्र डॉक्टर तिचा जीव वाचवू शकले नाहीत. कोर्टात सुनावणीदरम्यान या मुलीचे आई वडील गुन्हेगार असल्याचं सिद्ध झाल्यास त्यांना 7 ते 15 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Viral news