• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • स्वातंत्र्य दिनी देशात धक्कादायक प्रकार; मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं

स्वातंत्र्य दिनी देशात धक्कादायक प्रकार; मुलाने तरुणीची काढली छेड तर आई-वडिलांनी जिवंत जाळलं

या प्रकरणात तरुणीची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 • Share this:
  महोबा, 15 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील महोबा (Mahoba) जिल्ह्यातून छेडछाड केलेल्या तरुणीसोबत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीला आरोपी तरुणाच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याचा प्रकार उघड झाला आहे. ही घटना ठठेवरा गावातील आहे. पोलिसांनी भाजलेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पोलिसांनी या प्रकरणा गुन्हा दाखल केला असून आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठठेवरा गावातील जालिम सिंह याची पत्नी विनीता हिने गावात राहणाऱ्या कल्लूच्या विरोधात पोलीस ठाण्यात छेडछाडीची तक्रार केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गावातून फरार झाला. आपल्या मुलांविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे संतापलेल्या आरोपीच्या आई-वडिलांनी सकाळी शौचासाठी जात असताना विनीता हिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळलं. या घटनेनंतर तातडीन महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि पोलिसांना याची सूचना दिली. महिलेची प्रकृती गंभीर असून तिला मोठ्या रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. (The boy molested the girl and the parents burned her alive Shocking Incident) हे ही वाचा-Pune : लग्नसमारंभात जास्त हळद लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद; एकाचा गेला जीव महिलेला जिवंत जाळल्याची माहिती मिळताच एसपी, एएसपी सीओ रुग्णालयात पोहोचले असून त्यांनी पीडितेचा जबाब नोंदवला आबे. त्याशिवाय फरार झालेल्या आरोपीला तातडीने पकडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण वातावरण आहे. त्याशिवाय गावात सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.
  Published by:Meenal Gangurde
  First published: