दिल्ली 11 जुलै : दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (DTC) चे कर्मचारी संजीव कुमार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होता. या प्रकरणात आता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दोन्ही पत्नींनींच त्यांच्या हत्येचा कट रचल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे (2 Wives Killed Husband). हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी डीटीसी कर्मचाऱ्याची पत्नी, घटस्फोटित पत्नी तसंच मुलीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, डीटीसी कर्मचाऱ्याची पहिली पत्नी गीता (वय 54), त्यांची मुलगी कोमल (वय 21) आणि दुसरी पत्नी गीता उर्फ नजमा (28) अशी आरोपींची नावं आहेत. वहिनीच्या प्रेमात बेधुंद दीर, 21 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीसोबत केलं भयानक कृत्य या अधिकाऱ्याने सांगितलं की, दोन्ही पत्नींनी हा गुन्हा करण्यासाठी तीन वर्षे कट रचला आणि शार्प शूटरच्या मदतीने पतीची हत्या केली. ४५ वर्षीय पतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपायुक्त (दक्षिण-पूर्व) ईशा पांडे यांनी सांगितलं की, मजिदिया हॉस्पिटलमधून 6 जुलै रोजी याबाबतची माहिती मिळाली होती. अपघातस्थळावरून संजीव कुमार नावाच्या व्यक्तीला मृतावस्थेत रुग्णालयात आणलं गेल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. मृत व्यक्तीची पत्नी गीता देवी उर्फ नजमा हिने पतीला रुग्णालयात आणल्याचं आढळून आलं. गीता देवीने पोलिसांना सांगितलं की, ती भाजी मार्केटमधून पती आणि मुलासह दुचाकीवरून घरी परतत होती. त्यादरम्यान पती अपघाताचा बळी ठरला. अधिकाऱ्याने सांगितलं की, पतीला गोळ्या लागल्याचं वास्तव पत्नीने लपवलं. डीसीपींच्या म्हणण्यानुसार, गीता देवी उर्फ नजमा तपास चुकीच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न करत होती. दारुसाठी घरी मागितले पैसे, नकार दिल्याने रचला खूनाचा कट अन् रक्तानं माखलेल्या अवस्थेत मिळाला आई-बहिणीचा मृतदेह तिने सांगितलं की, मृत पतीला कालकाजी आगारातील डीटीसी कर्मचाऱ्यांनी धमकावलं होतं. पोलिसांच्या चौकशीत पत्नीचे दावे खोटे निघाले. सततच्या चौकशीत गीता देवी उर्फ नजमा हिने पतीने दोनदा लग्न केल्याचं उघड केलं. मृताच्या घटस्फोटित पत्नीचे नावही गीता आहे. आधीची पत्नी दक्षिणपुरी येथे मुलगा आणि २ मुलींसह वेगळी राहत आहे. गीतादेवी उर्फ नजमा आणि गीता या दोघी गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली. आधीची पत्नी गिता हिला मृत संजीव नवी पत्नी गीता उर्फ नजमा हिच्यासोबत क्रूरपणे वागतो, असं समजलं होतं. यानंतर तिने नजमाला नवीन फोन दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.