कैमूर, 10 जुलै : बिहार राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वहिनीसोबत अनैतिक संबंध (Immoral Relation with Sister in Law) असलेल्या दिराने आपल्याच पत्नीची हत्या (Wife Murder) केली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलेची हत्या करण्यात आली होती, तिचे 21 दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. घटनेची माहिती पोलिसांनी (Police) मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करत 24 तासांतच खुनाचा खुलासा केला.
चैनपूरच्या सिकंदरपूर गावात नवविवाहितेच्या खून प्रकरणाचा 24 तासांत खुलासा करत पोलिसांनी पती आणि वहिनीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधातून नवविवाहित महिलेचा खून करण्यात आला आहे. तिचा दुपट्ट्याने गळा दाबून तिला संपवण्यात आले. आरोपीला अटक करण्यासोबतच पोलिसांनी हत्येत वापरलेला स्कार्फही जप्त केला आहे. नियाज खान असे आरोपी पतीचे नाव आहे.
मृताची बहीण काय म्हणाली -
नियाज खान वारंवार अपाचे मोटारसायकलची मागणी करत असल्याने हुंड्यासाठी रुक्साना खातूनची हत्या करण्यात आल्याचे मृताची बहीण सलमा हिने सांगितले. आमच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे, त्यामुळे इतक्या लवकर मोटारसायकल देऊ शकलो नाही आणि नियाज खान नेहमी माझ्या बहिणीचा हुंड्यासाठी छळ करत असे, असेही तिने सांगितले.
तर भभुआच्या पोलीस उपअधीक्षक सुनीता कुमारी (DSP Sunil Kumar) म्हणाल्या की, 6 जुलै 2022 रोजी चैनपूर पोलिस स्टेशनला मृत नवविवाहितेचे नातेवाईक मुसरत खान यांनी तक्रार दिली होती. या तक्रारीत त्यांनी असे म्हटले की, नियान खान याने आपली वहिनी रुबीना हिच्यासोबत मिळून हुंड्याच्या मागणीतून आपली पत्नी रुकसाना हिची हत्या केली आहे आणि दोन्ही तिचा मृतदेह दफन करण्याच्या विचारात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. तसेच नियाज खान आणि रुबीना यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
हेही वाचा - पती शेकडो मैल दूर, इकडे काकू-पुतण्याचं जुळलं सूत; मात्र, प्रेमाचा The End ठरला दुर्देवी!
15 जूनला झाले लग्न -
सुनिता कुमारी यांनी पुढे सांगितले की, नियाज आणि रुकसाना या दोघांचे लग्न 15 जून 2022 रोजी झाले होते. मात्र, रुकसाना हिचा पती नियाज याचे त्याची वहिनी रुबीना हिच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. तसेच ते प्रेमसंबंध लपवण्याच्या विचारातून त्याने आपल्या पत्नीची हत्या केली. हत्येनंतर दोन्ही फरार झाले होते. मात्र, पोलिसांनी 12 तासांत दोघांना जेरबंद केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Women extramarital affair