मराठी बातम्या /बातम्या /देश /दारुसाठी घरी मागितले पैसे, नकार दिल्याने रचला खूनाचा कट अन् रक्तानं माखलेल्या अवस्थेत मिळाला आई-बहिणीचा मृतदेह

दारुसाठी घरी मागितले पैसे, नकार दिल्याने रचला खूनाचा कट अन् रक्तानं माखलेल्या अवस्थेत मिळाला आई-बहिणीचा मृतदेह

सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमन याने शेजारी राहणाऱ्या एकाला फोन करुन सांगितले की, तो आयटीआयमध्ये प्रवेश करायला कोरबा आला आहे.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमन याने शेजारी राहणाऱ्या एकाला फोन करुन सांगितले की, तो आयटीआयमध्ये प्रवेश करायला कोरबा आला आहे.

सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमन याने शेजारी राहणाऱ्या एकाला फोन करुन सांगितले की, तो आयटीआयमध्ये प्रवेश करायला कोरबा आला आहे.

कोरबा, 10 जुलै : छत्तीसगड (Chhattisgarh Korba) राज्यात एका व्यसनाधीन तरुणाने धक्कादायक कृत्य केले. त्याने आपली बहिण आणि आईची हत्या केली. (Murder of Mother and Sister) आरोपी तरुण हा दारू प्यायला पैसे मागत होता. मात्र, त्याच्या बहिणीने मनाई केले. तसेच त्याला रागावले. यानंतर त्याने रागाच्या भरात हे धक्कादायक कृत्य केले. ही घटना कोरबा जिल्ह्यातील आदर्श नगर कॉलनीतील (Adarsh Nagar Colony Korba) आहे. अमनदास असे आरोपीचे नाव आहे. (Guy Killed Mother and Sister)

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शनगर कॉलनीत रामकिशुन दास यांचे कुटूंब राहते. शुक्रवारी रामुकिशन दास सकाळी सहा वाजता कामावर गेले होते. घरात त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी आंचल आणि मुलगा अमन दास होता. सकाळी 11 वाजेच्या सुमारास अमन याने शेजारी राहणाऱ्या एकाला फोन करुन सांगितले की, तो आयटीआयमध्ये प्रवेश करायला कोरबा आला आहे.

आईने त्याला काही वस्तू आणायला सांगितल्या आहेत. मात्र, तो त्या विसरला. मोबाईलवरुन संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, बोलणे नाही झाले. असे सांगत अमन याने त्या शेजारी राहणाऱ्याला आईसोबत बोलणे करण्याची विनंती केली. मात्र, जेव्हा तो अमनच्या घरी पोहोचला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याला याठिकाणी अमन याची आई आणि बहिण रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळल्या. यानंतर त्या शेजारीने ही माहिती आजूबाजूच्या लोकांसह पोलिसांनाही दिली. यानंतर कुसमुंडा पोलीस घटनास्थळी हजर झाले. यानंतर त्यांनी तपासाला सुरुवात केली.

तपासादरम्यान मुलावर संशय -

पोलीस तपासादरम्यान समजले की, अमन दास हा व्यसनाधीन आहे. तो दारू आणि गांजासह अनेक अमली पदार्थांचे सेवन करतो. पोलिसांनी श्वानपथकाला पाचारण केल्यावर श्वान अमन जवळ जाऊन थांबला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केल्यावर त्याने आपला गुन्हा कबूल केला.

हेही वाचा - वहिनीच्या प्रेमात बेधुंद दीर, 21 दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

अमनने पोलिसांना सांगितले की, शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे घरी पैसे मागितले. मात्र, त्याला त्याच्या बहिणीने फटकारले. यावेळी दोघांत भांडणही झाले. नशेच्या अवस्थेत अवस्थेत असलेल्या अमन याने किचन रुममधून चाकू घेत बहिणीवर वार केले. जीव वाचवण्यासाठी ती बाथरुममध्ये घुसली. मात्र, त्याने बाथरुमचा दरवाजा तोडला आणि पुन्हा तिच्यावर चाकूने वार करत तिला संपवले. तसेच आपल्या आईचीही त्याने हत्या केली.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Crime news, Murder news