जालना, 23 मे: 2 लाख रुपयांचा हुंडा घेऊन साखरपुडा (engagement) केलेला असताना त्यांना धोका देत दुसऱ्याच मुलीशी लग्न करून डबलगेम खेळणं एका वरपक्षाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी नवरदेवासह वरपक्षातील 7 जणांविरुद्ध बदनापूर पोलीस (Badnapur Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील बाबूलाल हरी जाधव यांची मुलगी नीता हिचा विवाह औरंगाबाद तालुक्यात विजय गोविंद राठोड या मुलांबरोबर रीतिरिवाजाप्रमाणे ठरला होता. नवरदेव - नवरीच्या साखरपूडाही वधुपित्याने धडाक्यात केला. यावेळी वरपक्षाने 2 लाख रुपयांची मागणी केली असता बाबूलाल जाधव यांनी मुलीच्या सुखासाठी पैसेही दिले. असे असताना वर पक्षाकडून साखरपुडा झाल्यानंतर विवाह करण्यास टाळाटाळ करण्यात येऊ लागला.
ठरवलेल्या तारखेला लग्न न करता उडवाउडवी करण्यात येऊ लागली. त्यामुळे आपली फसवणूक करण्यात आली आहे, अशी बाब मुलीच्या वडिलांच्या लक्षात आली.
त्यामुळे वधू पक्षाची फसवणूक करीत असल्याबाबत मुलीचे वडील बाबूलाल जाधव यांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे गाठले आणि नवरा मुलगा गोविंद राठोड याच्यासह दिलीप पवार, बबन पवार, नवरा मुलाची बहीण सुनीता पवार (तिघे राहणार चितेपिंपळगाव, ता. औरंगाबाद), योगेश चव्हाण, श्रीचंद राठोड, वरपिता गोविंद रायसिंग राठोड अशा सात जनाविरोधात फसवणुकीची तक्रार दिली.
काँग्रेसच्या कार्यकर्त्याची अंत्ययात्रा काढल्यामुळे डॉक्टरांसह 200 जणांवर गुन्हा
तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी नवऱ्या मुलासह त्याचे वडील आणि बहिणीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जेव्हा नवऱ्या मुलाची चौकशी केली असता दुसऱ्या एका मुलीसोबत लग्न करण्याचा घाट या पवार कुटुंबाने घातला होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील या करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Engagement, Jalgaon, Maharashtra, Shocking