मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे कोरोनाने निधन, अंत्ययात्रा काढल्यामुळे डॉक्टरांसह 200 जणांवर गुन्हा दाखल

काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे कोरोनाने निधन, अंत्ययात्रा काढल्यामुळे डॉक्टरांसह 200 जणांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी अंत्ययात्रेतील गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना धक्काबुक्की करत अंत्ययात्रा काढण्यात आली.

पोलिसांनी अंत्ययात्रेतील गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना धक्काबुक्की करत अंत्ययात्रा काढण्यात आली.

पोलिसांनी अंत्ययात्रेतील गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना धक्काबुक्की करत अंत्ययात्रा काढण्यात आली.

सोलापूर, 23 मे: सोलापूरमध्ये (Solapur) कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून नियम जारी करण्यात आले आहे. पण, तरीही नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. रुग्णालयाने कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. या प्रकरणी डॉक्टरांसह 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सोलापुरातील काँग्रेसचा कार्यकर्ते करण म्हेत्रे (वय 42) यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर विनीत या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला.  धक्कादायक म्हणजे, या हॉस्पिटलला कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास परवानगी नव्हती. तरीही या हॉस्पिटलमध्ये करण म्हत्रे यांच्यावर उपचार करण्यात आले होते, असं वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे.

PPE Kits बाबत सरकारवर टीका करणाऱ्या डॉक्टरचा मृत्यू, निलंबनामुळे नैराश्यान घेरलं

कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर शासकीय नियमांप्रमाणे अत्यसंस्कार केले जातात, असं असतानाही  करण म्हेत्रे यांचा मृतदेह हा त्यांच्या नातेवाईकांकडे सुपुर्द करण्यात आला.  त्यानंतर नातेवाईकांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत करण म्हेत्रे यांची अंत्ययात्रा काढली आणि अंत्यविधी उरकला.

विराट कोहलीच्या मदतीनंतरही वाचला नाही जीव, क्रीडा विश्वातून दु:खद बातमी

पोलिसांनी अंत्ययात्रेतील गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांना धक्काबुक्की करत अंत्ययात्रा काढण्यात आली. अखेर या प्रकरणी

सदर बझार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमुख 20 जणांसह एकूण 200 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला भादवि कलम 353, 188, 268, 269, 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात  कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळेसह कॉंग्रेस नगरसेविकेचे पती जॉन फुलारी यांचा सहभाग आहे. तर मृत करण म्हेत्रे यांचा भाऊ बुग्गपा म्हेत्रे हा प्रमुख आरोपी आहे. तसंच डॉ.विद्याधर सूर्यवंशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: Congress, Maharashtra, Mumbai, Party