नाश्ता न दिल्यानं भडकला सासरा; सुनेला दिला भयंकर मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक घटना
नाश्ता न दिल्यानं भडकला सासरा; सुनेला दिला भयंकर मृत्यू, ठाण्यातील धक्कादायक घटना
ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक सासऱ्याने (Father-in-law) आपल्या सूनेचा (Daughter-In-Law) खून केला आहे. नाश्ता दिला नाही म्हणून त्याने आपल्या सूनेचा खून केला आहे.
ठाणे, 15 एप्रिल : ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक सासऱ्याने (Father-in-law) आपल्या सूनेचा (Daughter-In-Law) खून केला आहे. नाश्ता दिला नाही म्हणून त्याने आपल्या सूनेचा खून केला आहे. सिमा राजेंद्र पाटील राजेंद्र पाटील, असे मृत सूनेचे नाव आहे. त्या 42 वर्षांच्या होत्या. ही घटना काल (गुरुवारी) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास राबडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Rabodi Police Station) घडली.
गोळ्या झाडल्या -
सूनने नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्यावर गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विहंग शांती वन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सिमा राजेंद्र पाटील वय 42 यांचा खून झाला आहे. काशिनाथ पाटील या 74 वर्षीय सासऱ्याने हा खून केला.
आरोपी सासऱ्याला सतत नाश्ता दिल्यानंतर तो सतत बाहेर आपल्या सुनेची बदनामी करायचा. त्यामुळे त्याला सुनेने नाश्ताऐवजी फक्त चाहा दिला होता. यामुळे सासऱ्याला प्रचंड राग आला. रागाच्या भरात आरोपी सासरा काशिनाथ पाटील यांनी बंदूक घेऊन थेट सिमावर गोळी झाडली. तर सिमा यांच्या पोटात गोळी लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान राबोडी पोलिसांनी आरोपी सासऱ्याला आटक केली आहे. तसेच त्याच्याजवळ असलेली बंदूकही घटनास्थळाचा पंचनामा करुन जप्त केली आहे.
हेही वाचा - राज ठाकरेंच्या भोंगा विरोधी भूमिकेमुळे मनसेला गळती; मुंबई, मराठवाड्यातील 35 कार्यकर्त्यांचे राजीनामे
याप्रकरणी आरोपी काशिनाथ पांडुरंग पाटील (वय, 76) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307 (हत्येचा प्रयत्न) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) तसेच शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.