Home /News /maharashtra /

घरात वाद झाला अन् बापाने घरच्यांवरच केला गोळीबार, ठाण्यातील धक्कादायक घटना

घरात वाद झाला अन् बापाने घरच्यांवरच केला गोळीबार, ठाण्यातील धक्कादायक घटना

. शर्मा यांच्या घरात अनेक दिवस कौटुंबिक व मालमत्तेवरून वाद सुरू आहे.

. शर्मा यांच्या घरात अनेक दिवस कौटुंबिक व मालमत्तेवरून वाद सुरू आहे.

. शर्मा यांच्या घरात अनेक दिवस कौटुंबिक व मालमत्तेवरून वाद सुरू आहे.

    ठाणे, 15 एप्रिल : कौटुंबिक वादातून दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. ठाण्यामध्ये (thane) घरगुती वादातून वडिलांनी आपल्या कुटुंबीयांवर बेछुट गोळीबार (gun fire) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील माजीवडा परिसरात ही घटना घडली.  राजेश शर्मा असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. ही घटना संध्याकाळी 6.30 वाजता घडली. राजेश शर्मा हे लोढा लकजिरीया येथे राहतात. शर्मा यांच्या घरात अनेक दिवस कौटुंबिक व मालमत्तेवरून वाद सुरू आहे.  आज संध्याकाळी राजेश शर्मा हे दारूच्या नशेत घरी आले होते. त्यावेळी पुन्हा प्रॉपटीवरून वाद पेटला. याच रागातून राजेश शर्मा याने स्वतः जवळील पिस्तुल काढून अंदाधुंद गोळीबार केला.  या गोळीबारात 5 राऊंड फायर करण्यात आले होते. घटनेत कुणालाही दुखापत झाली. (लग्नानंतर आलिया भट्टचा मराठमोळ्या बॉडीगार्डही भावुक; आठवणीत शेअर केला हा Photo) घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राजेश शर्मा यांना कापूरबावडी पोलसानी ताब्यात घेतले असून  गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिली आहे. नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी  दरम्यान, आज सकाळी ठाण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. नाश्ता दिला नाही म्हणून सासऱ्याने गोळी झाडून सुनेचा खून केला.  ठाण्याच्या रुतू पार्क इथं ही घटना घडली.  विहंग शांती वन सोसायटीमध्ये राहणाऱ्या सिमा राजेंद्र पाटील (वय ४२) असं मृत महिलेचं नाव आहे.  ७४ वर्षीय सासरा काशिनाथ पाटील याने सूनेचा खून केला.  नाश्ता देवूनही सतत बाहेर बदनामी करत असल्याने सुनेने नाश्ता ऐवजी फक्त चहा दिला होता. यावेळेस रागाच्या भरात काशिनाथ पाटील यांनी बंदूक घेवून गोळी थेट सीमावर झाडली. पोटात गोळी लागल्याने सीमा गंभीर जखमी झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता मृत्यू झाला.  राबोडी पोलिसांनी सासऱ्याला अटक केली आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या