जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / प्रेमासाठी तरुणीचं धक्कादायक पाऊल; पळून जाण्याआधी पूर्ण कुटुंबाला जेवणातून दिलं विष अन्...

प्रेमासाठी तरुणीचं धक्कादायक पाऊल; पळून जाण्याआधी पूर्ण कुटुंबाला जेवणातून दिलं विष अन्...

प्रेमासाठी तरुणीचं धक्कादायक पाऊल; पळून जाण्याआधी पूर्ण कुटुंबाला जेवणातून दिलं विष अन्...

आरोपी मुलीचं नाव खुशबू असं असून तिनं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिचा पती सचिन हा बेरोजगार असल्याचं समोर आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

सूरत 19 सप्टेंबर : सूरतमध्ये (Surat) एका 18 वर्षीय मुलीवर आपल्याच कुटुंबातील सदस्यांना विष देऊन प्रियकरासोबत (Lover) फरार होत लग्न (Marriage) केल्याचा आरोप (Girl Poisons Family to Elope With Lover) आहे. आरोपी मुलीचं नाव खुशबू असं असून तिनं दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. तिचा पती सचिन हा बेरोजगार असल्याचं समोर आलं आहे. तर, यात त्याचे वडील अशोक यांचाही हात असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी (Police) शनिवारी प्रॉपर्टी ब्रोकर अशोकला अटक केली आहे. खुशबू आणि सचिन सध्या फरार आहेत. दुसऱ्या लग्नासाठी बापानं 4 मुलींचा घेतला जीव; मेहुणीसोबत बांधायची होती लग्नगाठ टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सूरतच्या डिंडोली भागात खुशबू आणि यांचं कुटुंब एकाच सोसायटीमध्ये राहत होतं. याच दरम्यान दोघांच्यात मैत्री झाली आणि नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. खुशबूचे आई-वडील या नात्याच्या विरोधात होते कारण खुशबू अल्पवयीन होती. दोन वर्षाआधी ती सचिनसोबत पळून गेली होती, मात्र तिला शोधून परत आणलं गेलं आणि तिचे कुटुंबीय दुसरीकडे शिफ्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतरही सचिननं खुशबूसोबतचं आपलं नातं कायम ठेवलं. खुशबू लग्नासाठी 18 वर्ष वय पूर्ण होण्याची वाट पाहत होती. अठराव्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनंतरच तिनं प्रियकरासोबत पळून जाण्याचा प्लॅन केला. दोघांनीही 12 सप्टेंबरला खुशबूच्या आई-वडिलांना बेशुद्ध करून घरातून पळून जाण्याचा कट रचला. यानंतर तिनं पिठामध्ये हे औषध मिसळलं. हे जेवण खाल्ल्यानंतर तिचे आई-वडील आणि भाऊ बेशुद्ध झाले. यावेळी अशोक खुशबूला घेण्यासाठी गेला. यानंतर ती सचिनसोबत फरार झाली. तिचे वडील वंजारा दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा उठले. यावेळी आपली मुलगी बेपत्ता असल्याचं पाहून त्यांना धक्काच बसला. दुकानात झालं प्रेम मग प्रेयसीसह तिच्या 3 मुलांचा केला गेम; कारण ऐकून व्हाल अवाक खुशबूच्या वडिलांनी आपली पत्नी आणि मुलाला उठवलं. याचदरम्यान वंजारा यांना पोलिसांनी फोन करून माहिती दिली की त्यांची मुलगी आपल्या पतीसोबत पोलीस ठाण्यात आली आहे. लग्नाचं रजिस्ट्रेशन करून खुशबू आणि सचिन ठाण्यात पोहोचले. दोघांचंही वय पूर्ण असल्यानं त्यांना सोडून देण्यात आलं. यानंतर वंजारा, त्यांची पत्नी आणि मुलाची प्रकृती बिघडू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती स्थिर होताच वंजारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी खुशबू, सचिन आणि अशोकवर विष देऊन त्रास देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात