Home /News /national /

प्रेयसी आणि तिच्या 3 मुलांची हत्या करुन पसार, मुंबईत येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

प्रेयसी आणि तिच्या 3 मुलांची हत्या करुन पसार, मुंबईत येताच पोलिसांनी आवळल्या मुसक्या

महिला आणि तिच्या तीन मुलांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केलं आहे.

    नवी दिल्ली, 19 सप्टेंबर : उत्तरप्रदेशातील बहराइच (Bahraich Uttar Pradesh) येथे गेल्या आठवड्यात एका महिलेसह तिच्या तीन मुलांची हत्या (Woman and her three children murder) झाली होती. या घटनेने एकच खळबल उडाली होती आणि पोलिसांवरही कारवाईसाठी प्रचंड दबाव होता. या प्रकरणी पोलिसांनी आपली सूत्र हालवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या चौघांच्या हत्येचं ठाणे (Thane) कनेक्शन समोर आलं आहे. पोलिसांच्या मते हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून झालं आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ननकू उर्फ मुबारक अली याचं मेरी नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, याच ननकूने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने 35 वर्षीय मेरी कत्रायन आणि तिच्या तीन मुलींची हत्या केली. या चौघांचेही मृतदेह 11 आणि 12 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशातील बहराइच येथे आढळून आल्या होत्या. लेकीच्या अपहरणाची खोटी तक्रार; पोलिसांकडून हैराण करणारा खुलासा एकाच दुकानात काम करत होते ननकू हा उत्तरप्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील निवासी असून तो ठाण्यातील मुंब्रा परिसरात एका दुकानात काम करत होता. त्याच दुकानात मेरी सुद्धा काम करत होती. साधारणत: वर्षभरापूर्वी मेरी आपल्या पतीपासून वेगळी झाली होती आणि आई-वडिलांसोबत राहत होती. दुकानात काम करता करता मेरी आणि ननकू या दोघांत आधी मैत्री झाली आणि त्यानंतर प्रेमसंबंध झाले. प्रेमसंबंध सुरू झाल्यानंतर मेरी हिने आपलं घरही विकलं आणि मिळालेले पैसे हे ननकूला दिले होते. यानंतर मेरी हिने ननकू याच्याकडे लग्न गरण्याची मागणी लावू धरली. ननकू हा आधीपासूनच विवाहीत होता. त्यामुळे तो मेरी हिच्या लग्नाच्या मागणीकडे दुर्लक्ष करु लागला. तर मेरी वारंवार लग्नाची मागणी करु लागली. मेरीच्या मागणीला वैतागलेल्या ननकू याने मग तिचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. मस्करी जिवावर बेतली, हेडफोन दिला नाही म्हणून तरुणाची हत्या, उल्हासनगरमधील घटना ननकू हा मेरी आणित्याच्या तीन मुलांना घेऊन 9 सप्टेंबर रोजी मुंबईहून उत्तरप्रदेशकडे निघाला. 10 सप्टेंबर रोजी तो बहराइच येथे पोहोचला. त्यानंतर तेथे ननकू आणि त्याच्या इतर साथीदारांनी मिळून मेरी आणि तिच्या तिन्ही मुलांची हत्या केली. त्यानंतर आरोपी हॉटेलमध्येच थांबले आणि मग 11 सप्टेंबर रोजी लखनऊ येथून मुंबईकडे निघाले. या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी तपासाची सूत्रे हालवली आणि आरोपीचा शोध घेतला. उत्तरप्रदेश पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली आणि त्यानंतर ठाण्यातील मुंब्रा परिसरातून आरोपी ननकू उर्फ मुबारक अली, सलमान खान आणि दानिश खान या तिघांच्या मुसक्या आवळल्या.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Uttar pradesh

    पुढील बातम्या