जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / राजधानी पुन्हा हादरली! बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचा आरोपीच्या आईवरच गोळीबार

राजधानी पुन्हा हादरली! बलात्कार पीडित अल्पवयीन मुलीचा आरोपीच्या आईवरच गोळीबार

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने २०२१ मध्ये महिलेच्या २५ वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता आणि तो मुलगा सध्या तुरुंगात आहे.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली 08 जानेवारी : दिल्लीतील भजनपुरा येथे एका 16 वर्षीय मुलीने एका 50 वर्षीय महिलेवर देशी बनावटीच्या पिस्तुलाने गोळ्या झाडल्या. या प्रकरणी अल्पवयीन मुलीला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने २०२१ मध्ये महिलेच्या २५ वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केला होता आणि तो मुलगा सध्या तुरुंगात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळी लागल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. पोलिस उपायुक्त संजय कुमार सेन यांनी सांगितलं की, पोलीस नियंत्रण कक्षाला शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता भजनपुरा येथील घोंडा भागात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. जेव्हा पोलीस पथक घटनास्थळी पोहोचलं तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की महिलेला तिच्या ओळखीच्या एका अल्पवयीन मुलीने गोळी मारली होती आणि पीडितेला स्थानिक रहिवाशांनी रुग्णालयात नेलं आहे. pune crime : एकाशी तुटलं, दुसऱ्याशी जुळलं अन् तिथेच हुकलं;10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं पोलीस जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की ही महिला तिच्या घराच्या तळमजल्यावर किराणा दुकान चालवते. महिला तिच्या दुकानात होती तेव्हा मुलगी तिच्याजवळ आली, तिच्यावर गोळी झाडली आणि नंतर घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिला, तिचे कुटुंबीय आणि स्थानिक रहिवासी हे सर्व आरोपी मुलीला ओळखू शकले. एका तपासकर्त्याने सांगितलं की, मुलीला काही तासांतच पकडण्यात आलं आणि तिने वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘अल्पवयीन मुलीने २०२१ मध्ये महिलेच्या २५ वर्षीय मुलावर बलात्काराचा आरोप केल्याचे समोर आले आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी ३७६ आणि पॉक्सो कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तो सध्या तुरुंगात आहे. Delhi Murder News : प्रियकराच्या मदतीन नवऱ्याला मारण्याचा रचला प्लॅन, भेटायला बोलावले अन् … आणखी एका तपासकर्त्याने सांगितले की, महिलेच्या आरोपी मुलाला आधीच अटक करण्यात आली असतानाही मुलीने महिलेवर गोळी का मारली हे अद्याप कळू शकलं नाही. पोलिसांनी सांगितलं की, “तपास प्राथमिक टप्प्यावर असून, मुलीची दीर्घ चौकशी केल्यानंतर महिलेवर गोळीबार करण्यामागचा हेतू स्पष्ट होईल.” यामागचा हेतू जाणून घेण्यासाठी आम्ही महिला, तिचे कुटुंबीय आणि आरोपीच्या कुटुंबीयांशीही बोलत आहोत. तरुणीकडे हे हत्यार कसं आणि कुठून आलं याचाही तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात