नवी दिल्ली, 08 जानेवारी : मागच्या काही दिवसांपासून दिल्लीत खूनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील अपघाताची घटना ताजी असतानाच नवीन घटनेने दिल्लीत जोरदार चर्चा रंगली आहे. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात 2 जानेवारीला तरुणाची हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होती. याप्रकरणी पोलिसांनी खुनाच्या या खळबळजनक प्रकरणाचा खुलासा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येचा संपूर्ण कट मृताच्या पत्नीसह तिच्या प्रियकराने रचला होता. मुनीशुद्दीन असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेच्या दिवशी दारू पिण्याच्या बहाण्याने आरोपींनी मृत रशीद याला रामघाट येथील निर्जन भागात बोलावले होते.
हे ही वाचा : pune crime : एकाशी तुटलं, दुसऱ्याशी जुळलं अन् तिथेच हुकलं;10 वर्षांनी प्रियकराने तोंड उघडलं
दरम्यान दारू पिऊन झाल्यानंतर या दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर मुनिषद्दी याने प्रथम रशीदच्या पोटात चाकूने वार केला. त्यानंतर त्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली. यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला आग लावून घटनास्थळावरून पळ काढला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत रशीदच्या पत्नीने चौकशीत सांगितले आहे की, तिचा पती अनेकदा दारूच्या नशेत तिच्याशी भांडण करत असे. व्यथित होऊन तिने मुनिशुद्दीनला हा प्रकार सांगितला. त्यानंतर दोघांनी मिळून रशीदच्या हत्येचा कट रचला. पोलिसांचे म्हणणे आहे की, 2 जानेवारी रोजी वजिराबादच्या रामघाट परिसरात तरुणाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळून आले होते.
हे ही वाचा : मोबाईल फुटल्याचे पैसे मागितल्याने तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल; आरोपीला अटक
यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासात पोलिसांनी रशीद असे मृताचे नाव दिले होते. यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी मुनीशुद्दीनची ओळख पटली. मात्र, घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. दरम्यान पोलीस तपासात आरोपी मुनीशुद्दीनला दिल्लीतील रोहिणी परिसरातून अटक केली आहे. दरम्यान याबाबतचा पोलीस अधिक तपास करत आहेत.