Home /News /crime /

PUBG च्या नादात भयंकर गुन्हा, अल्पवयीन तरुणाने केला 12 वर्षांच्या भावाचा खून

PUBG च्या नादात भयंकर गुन्हा, अल्पवयीन तरुणाने केला 12 वर्षांच्या भावाचा खून

अल्पवयीन तरुणाने PUBG गेमच्या व्यसनातून त्याच्या चुलत भावाचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    जयपूर, 14 डिसेंबर: PUBG गेम (PUBG GAME) खेळण्याच्या नादात 16 वर्षांच्या तरुणाने (16 year old) त्याच्याच चुलतभावाची (murder of brother) निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणाला पब्जी आणि फ्री फायर (Free Fire) या गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. त्यापायी त्याने भावाची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाची विल्हेवाटदेखील लावली. गेमचं व्यसन राजस्थानच्या नागौरमध्ये राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलाला ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन जडलं होतं. या व्यसनापायी त्यानं आतापर्यंत हजारो रुपयांचं कर्जही केलं होतं. रात्रंदिवस गेम खेळणारा हा तरुण सतत त्याच नादात असे आणि गेममध्ये पर्चेस करण्यासाठी पैसे कसे जमवता येतील, याच्या विवंचनेत असे. त्याच्याच शेजारी राहणारा त्याचा 12 वर्षांचा चुलतभाऊदेखील या गेम खेळत असे. असा केला खून घटनेच्या दिवशी 12 वर्षांचा भाऊ त्याच्या आईचा मोबाईल घेऊन त्याच्या चुलतभावाकडे गेम खेळायला गेला होता. त्यावेळी आपल्या धाकट्या भावाचा खून करून पैसे लुबाडण्याची योजना मोठ्या भावाने आखली. त्याला खेळता खेळता तो नदीच्या किनारी घेऊन गेला. त्याचा गळा दाबून खून केला आणि नदीकिनारी खड्डा खणून त्याचा मृतदेह तिथे दफन करून टाकला. मोबाईलवरून मागितली खंडणी भावाचा खून केल्यानंतर त्याच्याकडचा मोबाईल तरुणाने आपल्याकडे घेतला आणि त्यातील सिमकार्ड फेकून दिलं. त्यानंतर एक फेक इन्स्टाग्राम आय़डी तयार केला आणि स्वतःच्या मोबाईलचा हॉटस्पॉट वापरत भावाच्या मोबाईलवरून त्यावर लॉग इन केलं. आसाममध्ये राहणाऱ्या आणखी एका चुलत्यांना त्याने इन्स्टाग्रामवर संपर्क साधला आणि मुलाचं अपहरण झाल्याचं सांगितलं. मुलाचा जीव वाचवायचा असेल, तर 5 लाख रुपये तयार ठेवण्याची धमकीही त्याने दिली. हे वाचा- तुम्हालाही WhatsApp वर KBC चा मेसेज आलाय? रिप्लाय देण्याची घाई नको आधी हे वाचा पोलिसांना लागला सुगावा या प्रकाराची कल्पना पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी सायबर सेलच्या मदतीनं याचा तपास केला. त्यावेळी सर्व धागेदोरे आणि लोकेशन 16 वर्षांच्या तरुणापर्यंत पोहोचत असल्याचं दिसलं. तरुणाला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अल्पवयीन आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून नदीकिनारी पुरलेला मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Murder, Pubg game

    पुढील बातम्या