मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /1 जूनपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

1 जूनपासून पुण्यातील निर्बंध शिथिल करणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील विकेंड लॉकडाऊन हटविल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील विकेंड लॉकडाऊन हटविल्याचं वृत्त समोर आलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील विकेंड लॉकडाऊन हटविल्याचं वृत्त समोर आलं आहे.

पुणे, 30 मे : गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच पुण्यात रुग्णसंख्या पाचशेच्या खाली पोहोचली आहे. त्यामुळे पुणेकरांना कोरोनाच्या नियमांचं पालन करीत रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालं आहे. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, पुण्यातील लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Uddhav Thackeray live)

दरम्यान काही दिवसांपूर्वी पुण्यातील विकेंड लॉकडाऊन हटविल्याचं वृत्त आहे. पुण्यात कडक निर्बंध लावल्यामुळे येथील रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणं शक्य झालं आहे. विकेंड लॉकडाऊननंतर वेळांमध्ये काय काय बदल होऊ शकतो, याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात आहे.

हे ही वाचा-Lockdownमध्ये पुण्यात बार, बिअर शॉप सुरू; पोलिसांनी धाड टाकून केले सील

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबई, पुण्यातील रुग्णसंख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. दरम्यान पुण्यातून (Pune Coronavirus Update) एक चांगली बातमी समोर आली आहे. पुण्यातील रूग्णसंख्या तीन महिन्यात प्रथमच पाचशेच्या खाली आली आहे. याशिवाय सक्रिय रुग्णसंख्याही साडे सहा हजारांपर्यंत घसरली आहे. ( Pune breaks record for first time in three months)

विशेष म्हणजे क्रिटिकल रूग्णसंख्या देखील महिन्याभरानंतर हजाराच्या खाली आली आहे. गेल्या 24 तासात मृतांची संख्याही 30 पेक्षा कमी आहे. पुण्यात दिवसभरात 486 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून दिवसभरात 887 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात कोरोनाबाधीत 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून पुण्याबाहेरील रुग्णांचा आकडा 9 इतका आहे. सध्या पुण्यात 954 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहे.

First published:

Tags: Corona spread, Lockdown, Pune