पुणे, 26 मे: राज्यात कोरोनाचा (Corona) प्रादुभाव आणि चेन रोखण्यासाठी राज्य सरकारने 'ब्रेक द चेन' (Break the chain) अंतर्गत कठोर निर्बंध (strict restrictions) लागू केले आहेत. मात्र, असे असतानाही अनेक ठिकाणी नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे पुण्यातील हिंजवडी (Hinjawadi) परिसरात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या हॉटेल्स (Hotels), बिअर शॉप्स (Beer Shops), बारवर कारवाई करण्यात आली आहे.
कोविड नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करुन पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात हॉटेल्स, बार, बिअर शॉप सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकत हिंजवडी परिसरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, बिअर शॉप्स अशा एकूण 18 आस्थापनांवर कारवाई केली आहे.
VIDEO: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल 1 कोटींचा मद्यसाठा जप्त
या सर्वच्या सर्व 18 आस्थापना पोलिसांनी सील केल्या आहेत. हिंजवडी पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करुन सुरू ठेवणाऱ्या सर्व बार, हॉटेल, बिअर शॉप चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नेत्रृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांची नावे
हॉटेल बॉटमअप
हॉटेल अशोका बार अँड रेस्टो
हॉटेल ठेका रेस्टो अँड लॉज
हॉटेल रउडलाऊंज
हॉटेल मोफासा
श्री चायनिज अँड तंदुर पॉईंट
महाराष्ट्र हॉटेल भोजनालय
हॉटेल शिवराज
कविता चायनिज सेंटर
हॉटेल पुणेरी
हॉटेल टिमो
फॉर्च्युन डायनिंग एल एल पी
हॉटेल ग्रीनपार्क स्टॉट ऑन
हॉटेल आस्वाद
वॉटर 9 मल्टीक्युझिन रेस्टॉरंट अँड लंच
एस पी फॅमिली रेस्टॉरंट
योगी हॉटेल
यश करण बिअर शॉप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.