Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! HIV रुग्णाच्या शरीरातच 21 Corona Mutation; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली मोठी भीती

धक्कादायक! HIV रुग्णाच्या शरीरातच 21 Corona Mutation; शास्त्रज्ञांनी व्यक्त केली मोठी भीती

कोरोनाव्हायरस संक्रमणाच्या या प्रकरणामुळे शास्त्रज्ञांनाही आता चिंता वाटू लागली आहे.

    केपटाऊन, 01 फेब्रुवारी : कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) सातत्याने काही ना काही नवीन समोर येतं आहे. कोरोनाचा संसर्ग वारंवार होणं, एकाच व्यक्तीला कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटची (Corona variant) लागण होणं अशी काही प्रकरणं आपण पाहिली आहेत. पण आता मात्र एका प्रकरणाने धक्काच दिला आहे. एका महिलेच्या शरीरातच कोरोनाने स्वतःमध्ये तब्बल 21 बदल केले आहेत (Corona mutation). कोरोनाव्हायरसमध्ये 21 म्युटेशन झाले आहेत (Covid infected hiv patient developed 21 mutations). दक्षिण आफ्रिकेतील कोरोनाचं हे धक्कादायक प्रकरण आहे. 22 वर्षीय महिलेला एचआयव्ही होता. तिला कोरोना संसर्गही झाला. तब्बल 9 महिने तिच्या शरीरात कोरोनाव्हायरस होता. त्यातही धक्कादायक म्हणजे तिच्या शरीरातच कोरोना विषाणूमध्ये 21 म्युटेशन झाले. युनिव्हर्सिटी ऑफ क्लाजुलू नटालचे (University of KwaZulu-Natal) संशोधकांनी या महिलेचा अभ्यास केला. या महिलेमध्ये तिच्यामध्ये कोरोनाचा बिटा व्हेरिएंट होता. ज्यामुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली होती. संशोधकांच्या मते, शरीराची इम्युनिटी खूप कमी असल्याने कोरोनाव्हायरसने म्युटेशन म्हणजे स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. 10 म्युटेशन कोरोनाच्या स्पाइक प्रोटिनमध्ये झाले. याच स्पाइक प्रोटिनमार्फक कोरोना मानवी शरीरात घुसतो. याशिवाय 11 आणखी म्युटेशन झाले. व्हायरसमध्ये असे बदल दिसून आले जे ओमिक्रॉन आणि लॅम्डा व्हेरिएंटमध्ये आहेत. हे वाचा - 11 वर्षीय मुलाला वर्षभरातच अल्फा, डेल्टा, ओमिक्रॉनचा विळखा; कशी झाली अवस्था पाहा म्युटेशन म्हणजे व्हायरसमध्ये जेनेटिक बदल होते. या म्युटेशनमुळे नवा व्हेरिएंट तयार होते. आतापर्यंत अल्फा, बिटा, लॅम्डा, ओमिक्रॉन हे व्हेरिएंट म्युटेशनमुळेच तयार झाले आहेत. व्हेरिएंट खतरनाक असेल की नाही हे जेनेटिक बदलांवरच अवलंबून असतो. संशोधकांनी सांगितलं की, महिलेच्या शरीरात कोरोनाव्हायरसने जे म्युटेशन केले त्यामुळे खतरनाक व्हेरिएंट तयार होऊ शकतो आणि जगभरात महासाथीचं संकट वाढवू शकतं. हे पूर्णपणे वेगळं प्रकरण आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार 22 वर्षांची ही एचआयव्हीग्रस्त महिला जिच्यावर अँटी-रेट्रोव्हायरल ट्रिटमेंट चालू होती. तिच्या शरीरात आजारांशी लढणारी रोगप्रतिकारक प्रणाली कमजोर झाल्याने तिला कोरोना संक्रमण झाला. हे वाचा - Coronavirus: कधी होणार कोरोनाचा The End... भारतातील मोठ्या वैज्ञानिकांनी दिलं उत्तर सलग उपचारानंतर तिची रोगप्रतिकारक प्रणाली चांगली झाली तेव्हा ती कोरोनातून बरी होऊ लागली. कोरोनावर मात करायला तिला 6 ते 9 आठवड्यांचा कालावधी गेला.  जर रुग्णाला एचआयव्ही असेल आणि औषधं घेतली नाहीत तर तो रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने संक्रमित होऊ शकतो. अशी प्रकरणं रोखण्यासाठी अँटी-रेट्रो व्हायरल ट्रिटमेंट फायद्याची ठरेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, South africa

    पुढील बातम्या