देशात Remdesivir साठी अक्षरशः झुंबड; मात्र WHO म्हणतं, हे इंजेक्शन कोरोनावर प्रभावीच नाही

देशात Remdesivir साठी अक्षरशः झुंबड; मात्र WHO म्हणतं, हे इंजेक्शन कोरोनावर प्रभावीच नाही

रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इंजेक्शनची मागणी वाढण्याचं कारण म्हणजे हा कोरोनावर (Corona) उपचार समजला जात आहे.

  • Share this:

मुंबई 13 एप्रिल : भारतात एकीकडे कोरोनाचा (Coronavirus in India) प्रसार वाढला आहे, तर दुसरीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनची (Remdesivir Injection) मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या इंजेक्शनची मागणी वाढण्याचं कारण म्हणजे हा कोरोनावर उपचार समजला जात आहे. मात्र, जागितिक आरोग्य संघटनेनं (WHO) ही गोष्ट मान्य केलेली नाही. WHOनं याआधीही कोरोना रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर (Use of Remdesivir Injection) केला जात असल्यानं प्रश्न उपस्थित केले होते. आता पुन्हा एकदा WHOनं म्हटलं आहे, की असा कोणताही पुरावा नाही, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर उपचारासाठी उपयोगी आहे.

WHOचे मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथ आणि कोविडच्या टेक्निकल हेड डो मारिया वेन केरखॉव्ह यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना रेमडेसिवीर इंजेक्शनच्या वापरावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, रेमडेसिवीरसंदर्भात प्रथम पाच चाचण्या केल्या गेल्या आहेत, परंतु यानं कोरोनाचे रुग्ण बरे झाले नाहीत किंवा मृत्यूचं प्रमाणही कमी झालं नाही. त्यांनी असंही म्हटलं आहे, की एका मोठ्या क्लिनिकल ट्रायलचा निकाल अद्यापही प्रतीक्षित आहे, जेणेकरुन रेमेरेमडेसिवीर खरंच कोरोनावरील उपचारासाठी उपयोगी आहे का? हे शोधता येईल.

गुजरातमध्ये 11 दिवसांचं बाळ कोरोना पॉझिटिव्ह; देण्यात आलं Remdesivir इंजेक्शन

देशात या इंजेक्शनची मागणी वाढण्यासोबतच पुरवठादेखील कमी पडू लागला होता. बहुतेक राज्यांमध्ये या इंजेक्शनचा स्टॉक संपला होता. यानंतर सरकारनं या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली. भारतात कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून या इंजेक्शनचा वापर केला जात आहे.

डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितलं, की रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांवर या इंजेक्शनचा प्रयोग केला गेला होता. मात्र, यानं मृत्यू कमी झाले नाहीत किंवा रुग्ण बरेही झाले नाहीत. याच कारणामुळे WHO नं कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे इंजेक्शन न वापरण्याच्या सूचना मागील वर्षी दिल्या होत्या. तर, डॉ. वॅन कॅरखॉव्ह यांचं असं म्हणणं आहे, की या इंजेक्शनचं मोठं केमिकल ट्रायल केलं जात आहे. काही प्रकरणांमध्ये या इंजेक्शनमुळे भरपूर सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, तरीही ट्रायलच्या निकालानंतरच यावर काही बोलता येईल.

राजकारण Remdesivir चे! पुरवठा-तुटवड्यावरून राज्य सरकार आणि भाजप आमनेसामने

डॉ स्वामीनाथन म्हणाल्या, की काही अभ्यासांती असंही समोर आलं आहे, की हे इंजेक्शन कोरोना रुग्णांवर चांगला परिणाम दाखवत आहे आणि यामुळे मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र, हा रुग्णांचा एक खूप लहान गट होता. आम्ही अजूनही मोठ्या केमिकल ट्रायलच्या निकालाची वाट पाहात असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढील काही आठवड्यांमध्ये निष्कर्ष समोर येऊन याबाबत स्पष्टता येईल.

Published by: Kiran Pharate
First published: April 13, 2021, 10:31 AM IST

ताज्या बातम्या