• Home
  • »
  • News
  • »
  • videsh
  • »
  • तब्बल 262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; कोरोनामुळे 9 महिन्यांपासून होतं Lockdown

तब्बल 262 दिवसांनंतर हा देश घेणार मोकळा श्वास; कोरोनामुळे 9 महिन्यांपासून होतं Lockdown

ऑस्ट्रेलियात अलीकडेच नवीन रुग्णांच्या (Patient) संख्येत वाढ झाली असली तरी विकसित देशांच्या तुलनेत इथे रुग्ण संख्या कमी आहे. रविवारी इथे 1838 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला

  • Share this:
सिडनी 18 ऑक्टोबर : गेल्या दीड वर्षापासून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) संसर्गाने सर्वत्र हाहाकार माजवला. बघता बघता लाखो, कोट्यवधी लोक याच्या विळख्यात अडकले. कोरोना विषाणूमुळे अत्यंत झपाट्याने पसरणारा संसर्ग रोखण्यासाठी सुरुवातीच्या काळात बहुतेक देशांनी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा म्हणजेच लॉकडाउन (Lockdown) करण्याचा एकमेव पर्याय अवलंबला. आपल्या देशातही आपण दोन वेळा लॉकडाउनला सामोरे गेलो. संसर्गाचा वेग कमी झाल्यानंतर काही निर्बंध कायम ठेवून लॉकडाउन शिथील करण्यात आला. नंतर लस आल्याने लॉकडाउनचं प्रमाण कमी झालं. आता अखेर दीड वर्षांनंतर भारतासह अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका आहेच; पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावरील निर्बंध शिथिल झाले आहेत. एका देशात मात्र सर्वांत प्रदीर्घ काळ लॉकडाउन करण्यात आला होता, आता हा लॉकडाउन शिथिल करण्याचा विचार केला जात आहे. हा देश आहे ऑस्ट्रेलिया (Australia). ऑस्ट्रेलियामध्ये तब्बल 262 दिवस म्हणजेच सुमारे नऊ महिने लॉकडाउन करण्यात आलं होतं. आता जगभरातील परिस्थिती सुधारत असल्यानं ऑस्ट्रेलियातील सरकार नागरिकांना लॉकडाउनमधून मुक्ती देण्याची तयारी करत आहे. रशियामध्ये कोरोनाचा कहर; दिवसा 1000 हून अधिक रुग्णांचा मृत्यू, प्रशासन हतबल झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलियातील जनतेनं जगातील सर्वांत दीर्घ लॉकडाउन अनुभवला आहे. मार्च 2020 पर्यंत, सुमारे 50 लाख ऑस्ट्रेलियन लोकांनी सुमारे नऊ महिने किंवा 262 दिवसांसाठी सहा वेळा लॉकडाउन सहन केलं आहे. अर्जेंटिनाची (Argentina) राजधानी ब्यूनस आयर्समध्ये 234 दिवसांचा लॉकडाउन होता. ऑस्ट्रेलियातील लॉकडाउन त्यापेक्षाही अधिक होता. त्यामुळे जगातील सर्वाधिक लॉकडाउनचा विक्रम ऑस्ट्रेलियानं नोंदवला आहे. ऑस्ट्रेलियात अलीकडेच नवीन रुग्णांच्या (Patient) संख्येत वाढ झाली असली तरी विकसित देशांच्या तुलनेत इथे रुग्ण संख्या कमी आहे. रविवारी इथे 1838 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर सात जणांचा मृत्यू झाला. ऑस्ट्रेलियातील धोका अद्याप टळलेला नसला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. या आठवड्यात लसीकरण (vaccination) 70 टक्क्यांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्यानं आता नियम शिथील करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 80 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण होताच, लॉकडाउनमधून कायमची सुटका होऊ शकते. या आठवड्याच्या अखेरीस घरी राहण्यासारखे सर्व निर्बंध उठवले जातील, अशी माहिती मेलबर्नच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे ऑस्ट्रेलियातून इतर देशांमध्ये प्रवास करण्यास किंवा तिथल्या नागरिकांना ऑस्ट्रेलियात येण्यास परवानगी देण्यात येत आहे. यामध्ये शेजारी देश न्यूझीलंडचा (New Zealand) समावेश आहे भारत विक्रमी 100 कोटी लसीकरणाच्या अगदी जवळ; या आठवड्यात घडेल इतिहास न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर कोरोना संसर्गाचे एकही प्रकरण नसल्याने तिथून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरणाच्या अटीतून मुक्तता देण्यात आली आहे. न्यूझीलंडमध्ये गेल्या ऑगस्टपासून लॉकडाउन सुरू आहे. आता न्यूझीलंड सरकारने लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर भर दिला असून,लवकरच परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. रविवारी न्यूझीलंडमध्ये 51 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली त्यापैकी 47 प्रकरणे ऑकलंडमधील आहेत. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियन सरकार सिंगापूर सरकारशी (Singapore) दोन्ही देशांमधील प्रवास सुरू ठेवण्याबाबत चर्चा करत आहे. मात्र ज्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांनाच ऑस्ट्रेलिया आणि सिंगापूर दरम्यान प्रवासाची परवानगी मिळणार आहे.
First published: