मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनावर मात करण्यासाठी लहान मुलांचं लसीकरण फायदेशीर ठरेल?

कोरोनावर मात करण्यासाठी लहान मुलांचं लसीकरण फायदेशीर ठरेल?

मुलं (Children) हा देखील लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने लसीकरण कार्यक्रमात त्यांनाही सामावून घेण्याची गरज आहे.

मुलं (Children) हा देखील लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने लसीकरण कार्यक्रमात त्यांनाही सामावून घेण्याची गरज आहे.

मुलं (Children) हा देखील लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने लसीकरण कार्यक्रमात त्यांनाही सामावून घेण्याची गरज आहे.

नवी दिल्ली, 6 मे: 11 मार्च 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) जाहीर केलं, की कोविड-19 (Covid19) ही जागतिक महामारी (Pandemic) आहे. त्यानंतर त्यावरच्या लशीच्या संशोधनालाही प्रचंड वेग आला. त्यानंतर बरोब्बर नऊ महिन्यांनी 11 डिसेंबर 2020 रोजी जगातल्या पहिल्या कोविड-19 लशीला आपत्कालीन वापरासाठी (Emergency Use) मंजुरी मिळाली. फायझर-बायोएनटेक (Pfizer-BioNTech) या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीला हा मान मिळाला. कोणतीही विशिष्ट उपचार पद्धती नसल्यामुळे चाचण्या आणि प्रतिबंध यावर जोर दिला जात होता; मात्र सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave) अत्यंत भयावह रूप धारण केलं असून, तिसऱ्या लाटेचे ढगही घोंघावू लागले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण (Vaccination) हाच एकमात्र आशेचा पर्याय दिसतो आहे. 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू जागतिक पातळीवरची लशीची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्पादनात वाढ करायची झाली, तरी त्याला विशिष्ट कालावधी लागेल. सध्या डोसची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे त्यात प्राधान्यक्रम ठरवण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे लसीकरणाचे फायदे वैयक्तिक, तसंच लोकसंख्येच्या पातळीवरही जास्तीत जास्त दिसतील. या विचाराने 16 जानेवारी 2021 रोजी भारतात डॉक्टर्स, आरोग्य क्षेत्रातले कर्मचारी आणि अन्य अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. त्यानंतरच्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि नंतर एक एप्रिलपासून 45 वर्षांच्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं. आता एक मेपासून 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाची सुरुवात झाली आहे. वाचा: कोरोना लस पेटंटमुक्त होण्याचा मार्ग मोकळा, अमेरिकेने दिली मंजुरी पाच मेपर्यंतच्या स्थितीचा विचार केला, तर भारतात एकंदर 16 कोटी 25 लाख डोस देऊन झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये लशींचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा असल्यामुळे काही शहरांत लसीकरण बंद आहे. तसंच, अनेकांच्या मनात लसीबद्दल असलेल्या शंका हाही लसीकरण कार्यक्रमातला अडथळाआहे. मोठ्या प्रमाणावरच्या लोकसंख्येचं लसीकरण होण्यासाठी अधिक नेटाने प्रयत्न केले नाहीत, तर हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी खूपच वेळ लागू शकतो. हर्ड इम्युनिटी म्हणून एखाद्या रोगाबद्दलची सामुदायिक प्रतिकारशक्ती. ती विकसित होणं हाच लसीकरण कार्यक्रमाचा हेतू असतो. ...म्हणून लहान मुलांना लसीकरणात सामावून घेण्याची गरज मुलं (Children) हा देखील लोकसंख्येचा मोठा भाग असल्याने लसीकरण कार्यक्रमात त्यांनाही सामावून घेण्याची गरज आहे. 2011च्या जनगणनेनुसार, देशाची 35 टक्के लोकसंख्या 0-14 या वयोगटातली, तर 10 टक्के लोकसंख्या 15 ते 19 या वयोगटातली आहे. मुलं म्हणजे रोगाची सहज लक्षात न येणारे वाहक आहेत. ती संसर्गाचा स्रोत आहेत हे सहज लक्षात येत नसल्यामुळे आणि त्यांना सहजपणे विलगीकरणात ठेवणं शक्य नसल्यामुळे त्यांच्यापासून असलेला धोका मोठा आहे. मोठ्यांच्या किंवा ज्येष्ठांच्या संरक्षणासाठी छोट्या मुलांचं लसीकरण (Child Vaccination) करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या विचारावर काही प्रश्न उपस्थित करण्यात आले. अगदी अलीकडेपर्यंत असं समजलं जात होतं, कीअन्य वयोगटांपेक्षा कोविड-19ची लागण होण्याचं प्रमाण बालकांमध्ये कमी आहे. कारण तुलनेने फारच थोड्या मुलांचा कोविड-19च्या गुंतागुंतीमुळे मृत्यू झालाय किंवा फारच थोड्या मुलांना गंभीर लक्षणं किंवा लक्षणं दिसली. आताचे ट्रेंड्स पाहिले तर मात्र परिस्थितीत बदल झालेला दिसतो. वाचा: आईने रोखलं तरी कोरोनाग्रस्त बापाला पाणी पाजण्यासाठी लेकीची धडपड; डोळ्यादेखत तडफडून मृत्यू तरुणांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक बेसावध असताना गाठलेल्या दुसऱ्या लाटेने आरोग्य यंत्रणेवर अति ताण आणला. हे लक्षात घेतलं पाहिजे की या लाटेत संसर्गाची क्षमता जास्त असल्याने मुलांमध्ये संसर्गाचं प्रमाण जास्त असल्याचं दिसलं. तसंच पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक दिसलं. हॉस्पिटलायझेशन आणि अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागलेल्या मुलांची संख्याही बऱ्यापैकी वाढल्याचं दिसून आलं. त्यामुळे ज्यांची वैद्यकीयदृष्ट्या खूप काळजी घेण्याची गरज आहे, अशा लोकसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे भारतात लहान मुलं आणि 18 वर्षांखालच्या मुलांनाही लसीकरण कार्यक्रमात सामावून घेणं गरजेचं झालं आहे. लहान मुलांचं लसीकरण हा प्रौढांच्या लसीकरणाच्या तुलनेत प्रशासकीयदृष्ट्या सोपा कार्यक्रम ठरू शकतो. कारण मुलांचं लसीकरण हा खासगी आणि सरकारी हॉस्पिटल्समधला नियमित कार्यक्रम असतो. पल्स पोलिओ (Pulse Polio) लसीकरण कार्यक्रमातलं यश आणि सातत्य, तसंच अलीकडचा MMR कार्यक्रम यांतून आपल्याकडची लहान मुलांच्या लसीकरणाची यंत्रणा चांगली असल्याचं दिसून आलं आहे. तसंच कोविड-19मुळे मागे पडलेला नियमित लसीकरण कार्यक्रमही या लशीमुळे पुनरुज्जीवित करता येऊ शकेल. लशीची पाच ते 12 या वयोगटातल्या मुलांवर चाचणी सुरू लशीची सुरक्षितता (Safety)आणि प्रभाव (Effectiveness) या मुद्द्यांवर येऊ या. आपल्याला हे माहिती आहे, की कोणतीही लस 100 टक्के प्रभावी आणि 100 टक्के सुरक्षित नसते. त्याला कोविड-19 लशींचाही अपवाद नाही. त्यामुळे सुरक्षितता आणि प्रभावीपणा यांची पातळी स्वीकारार्ह आहे, हे मानवी चाचण्यांतून सिद्धझालं पाहिजे. फायझर कंपनीने12वर्षांवरच्या वयोगटात त्यांच्या लशीची चाचणीघेतली असून, 12ते15वर्षांच्या वयोगटाच्या लसीकरणाला परवानगी देणारा कॅनडा हा पहिला देश ठरला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लशीची पाच ते 12 या वयोगटातल्या मुलांवर चाचणी सुरू आहे. आणखी काही लस उत्पादक कंपन्यांनी सहा महिन्यांवरच्या मुलांमध्ये लशीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. वाचा: माणसातला देव! कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral आतापर्यंतच्या अन्य सगळ्या लशींप्रमाणेच छोट्या-छोट्या त्रासांच्या तुलनेत एकंदर फायदेजास्त असतील, तर कोविड-19च्या लसीकरणातूनही लहान मुलांचं संरक्षणच होईल. तसंच हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) वाढायला मदत होईल आणि संभाव्य तिसरीलाट रोखली जाऊ शकेल. ज्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे, तिथे नव्या रुग्णांची संख्या घटत आहे. इस्रायल, यूएई, ब्रिटन आदी देशांत तसं दिसत आहे. 'दी इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअट्रिक्स'च्या (IAP) 30 राज्य शाखा आणि 337 शहर आणि जिल्हा शाखांमध्ये मिळून 30 हजारांहून अधिक सदस्य बालरोगतज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. ही संस्था जवळपास संपूर्ण देशात पसरलेली आहे. या समर्पित आणि कुशल मनुष्यबळचा वापर करून घेऊन कोविड-19च्या लसीकरणाची व्याप्ती खासकरून मुलांमध्ये वाढवता येऊ शकेल. उदाहरणार्थ, एका बालरोगतज्ज्ञाला (Paediatrician) एक हजार डोसेस दिले, तर त्याचे नेहमीचे पेशंट असलेली मुलं आणि त्यांचे आई-वडील यांना तो डोसेस देऊ शकतो. अशाप्रकारे लसीकरणाची व्याप्ती कमी वेळात वाढवता येऊ शकेल. तसंच, यासाठी नव्यापायाभूत सुविधांची किंवा प्रशिक्षणाचीही गरज भासणार नाही. कारण या आवश्यक दोन्ही गोष्टींसाठी बराच वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यात त्रुटीही राहतात. मोठ्यांच्या तुलनेत लहानांकडून असलेली लसीती स्वीकारार्हता जास्त असते. त्यामुळे मुलांचं लसीकरण केल्यास फार मोठी लोकसंख्या लवकरात लवकर लसीकरणाच्या कक्षेत येऊ शकेल. त्यामुळे एकंदरीतच लशीची स्वीकारार्हताही वाढू शकेल. आई-वडिलांचा आपल्या मुलांच्या डॉक्टरवर विश्वास असतो. त्यामुळे त्यांच्याकडून लस घ्यायला त्यांनाही काही वाटणार नाही. लसीकरण झालेल्यांची संख्या वाढली, की हर्ड इम्युनिटीला चालना मिळू शकते. भारतात संसर्गाचा वेग आणि संसर्गग्रस्तांची संख्या प्रचंड वाढलेली असल्याने लसीकरण झालेल्यांच्या संख्येत तातडीने वाढ होणं खूप महत्त्वाचं ठरेल. सामुदायिक पातळीवर प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी लसीकरण मोठ्यांपुरतंच मर्यादित ठेवण्याऐवजी छोट्यांना लसीकरणाच्या कक्षेत आणणं हे प्रभावी धोरण ठरेल. लहानांचं लसीकरण सुरू करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय आपल्यापुढे दिसत नाही. -डॉ. बकुल जयंत पारेख, डॉ. समीर हसन दलवाई (डॉ. बकुल पारेख हे इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअट्रिक्सचे अध्यक्ष असून, सीनिअर कन्सल्टंट आहेत. डॉ. समीर दलवाई हे इंडियन अकॅडमी ऑफ पेडिअट्रिक्सचेराष्ट्रीय सहसचिव असून, डेव्हलपमेंटल बिहेवियरल पेडिअट्रिशियन आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक आहेत.)
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या