मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

आईने रोखलं तरी कोरोनाग्रस्त बापाला पाणी पाजण्यासाठी लेकीची धडपड; डोळ्यादेखत तडफडून मृत्यू

आईने रोखलं तरी कोरोनाग्रस्त बापाला पाणी पाजण्यासाठी लेकीची धडपड; डोळ्यादेखत तडफडून मृत्यू

लेकीच्या हाताने पाण्याचे शेवटचे काही घोट पिऊन कोरोनाग्रस्त बापाने आपला जीव सोडला.

लेकीच्या हाताने पाण्याचे शेवटचे काही घोट पिऊन कोरोनाग्रस्त बापाने आपला जीव सोडला.

लेकीच्या हाताने पाण्याचे शेवटचे काही घोट पिऊन कोरोनाग्रस्त बापाने आपला जीव सोडला.

हैदराबाद, 06 मे : गेले काही दिवस सोशल मीडियावर काळीज पिळवटून टाकणारे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कोरोना काळात प्रत्येक जण आपल्या प्रिय आणि जवळच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. काही दिवसांपूर्वीच लेकीने आपल्या आईला वाचवण्यासाठी तोंडाने ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला, तर आता कोरोनाग्रस्त बापाला पाणी पाजण्यासाठी धडपडणाऱ्या लेकीचा व्हिडीओ समोर आला आहे (daughter trying to saved corona positive father) . हा व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यातील अश्रू थांबवणार नाहीत. आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) हा वेदनादायी असा व्हिडिओ आहे. कोविड-19 ने (Covid 19) गंभीर रूप धारण केल्यामुळे शेवटचे श्वास मोजत असलेल्या आणि झोपडीबाहेर जमिनीवर तडफडत असलेल्या आपल्या वडिलांना पाणी पाजण्यासाठी तरुण मुलगी खूप प्रयत्न करते आहे. तिला तिची आईच तसं करण्यापासून परावृत्त करते आहे. शेवटी तिला प्रतिकार करून, तिच्यापासून स्वतःला सोडवून तिने आपल्या वडिलांच्या मुखी पाणी ओतलं. वडिलांना वाचवण्यासाठी तिने पुरेपूर धडपड केली. पण तिची ही धडपड व्यर्थ ठरली. तिच्या डोळ्यादेखत तिच्या वडिलांचा तडफडत मृत्यू झाला. लेकीच्या हातचे पाण्याचे शेवटचे काही घोट पिऊन बापाने आपला जीव सोडला. हे वाचा - माणसातला देव! रुग्णांच्या मदतीसाठी धावले आमदार, जमीनीवरच झोपलेला Photo Viral इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम (Srikakulam) जिल्ह्यातल्या जी. सिगदम मंडलातल्या कोय्यनापेटा (Koyyanapeta) गावातले रहिवासी असलेले 50 वर्षांचे मजूर असिरा नायडू यांच्याबाबतीत घडलेला हा दुर्दैवी प्रसंग. ते विजयवाडामध्ये (Vijaywada) मजुरीचं काम करत.  कोविड पॉझिटिव्ह (Covid Positive) झाले. कोरोनामुळे लॉकडाउन लागू होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांनी आपल्या मूळ गावी परतायचा निर्णय घेतला. हे वाचा - मन सुन्न करणारी घटना;4 दिवस सडत होता महिलेचा मृतदेह, उंदीर अन् मुंग्यांनी खाल्ला रविवारी (दोन मे) हे कुटुंब आपल्या मूळ गावी परतलं. मात्र गावात पोहोचल्यानंतर त्यांच्या आजारपणाबद्दल कळल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांना गावापासून दूर असलेल्या एका उघड्या शेतातल्या झोपडीत विलगीकरणात राहायला सांगितलं. दोन दिवसांत असिरा नायडू यांची तब्येत खालावत गेली आणि अखेर पत्नी आणि मुलीच्या समोरच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
First published:

Tags: Andhra pradesh, Coronavirus

पुढील बातम्या