मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccination : कोरोना लसीकरणाबाबत UP पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्राच्या नावी आहे हा रेकॉर्ड

Corona Vaccination : कोरोना लसीकरणाबाबत UP पहिल्या क्रमांकावर; महाराष्ट्राच्या नावी आहे हा रेकॉर्ड

एक लाख रुग्णांमागे 4.8 लोकांना या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असल्याचं हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

एक लाख रुग्णांमागे 4.8 लोकांना या चेहऱ्याच्या पक्षाघाताचा धोका असल्याचं हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटलं आहे.

वयस्कर लोकांच्या लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र (Corona Vaccination in Maharashtra)आणि गुजरात पुढे आहेत. तर, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 31 ऑगस्ट : देशात सध्या कोरोना लसीकरणाच्या (Corona Vaccination in India) बाबतीत उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात आतापर्यंत 7.04 कोटी लसीचे डोस दिले गेले आहेत. तर, वयस्कर लोकांच्या लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र (Corona Vaccination in Maharashtra) आणि गुजरात पुढे आहेत. तर, लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. उत्तर प्रदेशात केवळ 16 टक्के लोकांनाच लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हा आकडा खूप जास्त आहे.

मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी,

गुजरातमध्ये आतापर्यंत 4.55 कोटी जणांनी लस घेतली आहे, यातील 1.13 कोटी लोकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. पश्चिम बंगाल, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांमध्येही लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक एक कोटीपेक्षा जास्त आहेत. उत्तर प्रदेशबद्दल बोलायचं झाल्यास इथे केवळ लसीकरणाचा वेग वाढला नाही तर ऑगस्ट महिन्यातील लसीकरणाची टक्केवारीही बरीच वाढली आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात दररोज 7.06 लाख लसीचे डोस दिले गेले. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये हा आकडा पाच लाखापेक्षाही कमी राहिला.

सेक्सचा अड्डा झालं Covid सेंटर; ड्रग्स, सिगारेट, हुक्का आणि...; CCTV मधून खुलासा

उत्तर प्रदेशमध्ये ऑगस्ट महिन्यात लसीचे 2.2 कोटी डोस दिले गेले. यानंतर मध्य प्रदेशात 1.33 कोटी डोस दिले गेले. यापाठोपाठ महाराष्ट्रात 1.25 कोटी, गुजरात 1.21 कोटी, बिहार 1.08 कोटी आणि कर्नाटकात 1.05 कोटी डोस दिले गेले. सीएनएन न्यूज 18 द्वारे करण्यात आलेल्या राज्यांच्या विश्लेषणात असं समोर आलं आहे, की लसीकरणाच्या बाबतीत दिल्ली भरपूर मागे आहे. राज्यात ऑगस्ट महिन्यात दररोज 1.08 लाख लसीचे डोस दिले गेले. तर, हरियाणा आणि ओडिशामध्ये 1.49 लाख आणि 1.78 लाख डोस दिले गेले. देशात कोरोना लसीकरणाची सुरुवात याच वर्षी 16 जानेवारीपासून झाली आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Vaccinated for covid 19