मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, तिसऱ्या लाटेला सुरुवात?

मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, तिसऱ्या लाटेला सुरुवात?

ज्या इमारतींमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या किंचित वाढल्याने ही तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना?

ज्या इमारतींमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या किंचित वाढल्याने ही तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना?

ज्या इमारतींमध्ये 5 किंवा त्यापेक्षा अधिक कोविड बाधित रुग्ण आढळून आल्यास अशी इमारत ‘सील’ करण्यात येणार आहे. रुग्णसंख्या किंचित वाढल्याने ही तिसऱ्या लाटेची सुरुवात तर नाही ना?

  मुंबई, 30 ऑगस्ट: कोरोना रुग्णांची संख्या (Covid-19 Mumbai updates) पुन्हा एकडा वाढू लागल्याने प्रशासन सतर्क झालं आहे. महापालेकेनं पुनः एकदा काटेकोर नियमांची अंमलबजावणी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. आता इमारतीमध्ये 5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येणार आहे.

  गेल्या काही दिवसात कमी झालेली नव्या कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा किंचित वाढते आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर आणि बाजारपेठेतही गर्दी वाढली आहे. त्यातच तिसऱ्या लाटेसंदर्भात सातत्याने इशारा देण्यात येतो आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी अधिकाऱ्यांबरोबर तातडीची बैठक घेतली. या बैठकीत कोविड नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचं ठरलं आहे.

  सील झालेल्या इमारतीत ड्रायव्हर, कामवाल्या बायकांनाही प्रवेश नाही

  या बैठकीत कोविड नियमालींची पूर्वीसारखी काटेकोर अंमलबजावणी करण्याचं ठरलं आहे. त्यानुसार आता 5 पेक्षा अधिक कोरोना रुग्ण असलेली इमारत सील करण्यात येईल. अशा इमारतींमध्ये प्रवेश करण्यास कोणालाही अनुमती असणार नाही. इमारतींमध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. त्याचबरोबर अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहन चालक यांना देखील सदर कालावधी दरम्यान इमारतीमध्ये प्रवेश असणार नाही. त्यामुळे कामवाल्या बायका, ड्रायव्हर बाहेरून येत असतील तर त्यांची सेवा बंद राहणार आहे.

  Corona Update: देशात आठवडाभरात 32 टक्के रुग्णवाढ; गाठला दोन महिन्यातील उच्चांक

  इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्व सील इमारतींच्या गेटवर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देखील महानगरपालिका आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले आहेत. त्याचबरोबर महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने देखील निर्धारित करण्यात आलेल्या कार्य पद्धतीनुसारच सील इमारती विषयक आवश्यक ती सर्व कार्यवाही वेळच्यावेळी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  सहकार्याचं आवाहन

  "तिसऱ्या लाटेची संभाव्यता लक्षात घेता खबरदारीची उपाययोजना म्हणून आणि कोविड या साथरोगाचा संसर्ग इतरांना होऊ नये, या उद्देशाने प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी अत्यंत कठोरपणे करण्यात येत आहेत.

  राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होण्याची शक्यता? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती

  यामुळे सील केलेल्या इमारतींमधील नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते, याची नम्र जाणीव महानगरपालिका प्रशासनाला आहे. पण कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने हे गरजेचं असून, यासाठी सर्व संबंधितांनी परिपूर्ण सहकार्य करावं", असं आवाहन देखील आयुक्तांनी केलं आहे.

  मास्क नसेल तर कठोर कारवाई

  मुंबईत कोविड बधितांची संख्या किंचित वाढली असल्याने कोविड चाचणी केंद्र पुन्हा एकदा मुंबईभर सुरू करण्यात आली आहेत. 266 केंद्रावर कोविड चाचणी केली जात आहे. विना मास्क असणाऱयावर पुन्हा आक्रमक कारवाई करण्यात येणार आहे.

  कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या 3 बाबींचे परिपूर्ण पालन सर्व ठिकाणी योग्यप्रकारे होत असल्याची खातरजमा व जनजागृती नियमितपणे करण्याचे निर्देश  आयुक्तांनी दिले आहेत. यामध्ये योग्यप्रकारे मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे आणि वारंवार योग्यप्रकारे साबणाने हात धुणे या बाबींचा समावेश आहे.

  अशी आहे तयारी

  कोविडच्या तिस-या लाटेची शक्यता आणि डेल्टा प्रकारच्या कोविड विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोविड रुग्णालये यांना सतर्क व सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अंतर्गत प्रामुख्याने सर्व रुग्णालयांमधील आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा, रुग्णखाटा, रुग्णवाहिका, रुग्णालयातील मनुष्यबळ, आवश्यक ती साधनसामुग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधे-गोळ्या-इंजेक्शन्स साठा इत्यादी सर्व बाबींचा आढावा घेतला जात आहे.

  लहान मुलांची काळजी घ्या! मुंबईतील मानखुर्दमध्ये 18 मुलं कोरोना पॉझिटिव्ह

  कोविड बाधा झाल्याची चाचणी लवकरात लवकर होणे हे रुग्णाच्या दृष्टीने तसेच कोविड प्रतिबंधाच्या दृष्टीने आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिका क्षेत्रात २६६ कोविड चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तरी ज्यांना कोविडची लक्षणे असतील, त्यांनी कोविड चाचणी केंद्रात जाऊन कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच सील इमारतींमधील व्यक्तींची देखील टप्प्या-टप्प्याने कोविड चाचणी करण्यात येईल.

  महापालिकेच्या सर्व 24 विभागांमध्ये असणा-या सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून 5 वेळा निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) करण्यात येणार आहे.

  लसीकरण वाढलं तरीही...

  बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षे आणि अधिक वय असणाऱ्या सुमारे 74 टक्के नागरिकांंनी किना एक लस घेतलेली आहे. उर्वरित 26 टक्के नागरिकांं चं लसीकरण व्हावं, या दृष्टीने सर्वस्तरीय प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले आहेत.

  First published:

  Tags: Coronavirus, Coronavirus cases, Mumbai