मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोना पुन्हा मोठा संहार करणार! Omricon मुळे एप्रिलपर्यंत UK मध्ये 75 हजार मृत्यूंची शक्यता वर्तवली

कोरोना पुन्हा मोठा संहार करणार! Omricon मुळे एप्रिलपर्यंत UK मध्ये 75 हजार मृत्यूंची शक्यता वर्तवली

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या (LSSTM) संशोधकांनी Omicron च्या साथीचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये सध्या रुग्णदुपटीचा वेग दोन-तीन दिवसांवर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या (LSSTM) संशोधकांनी Omicron च्या साथीचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये सध्या रुग्णदुपटीचा वेग दोन-तीन दिवसांवर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिनच्या (LSSTM) संशोधकांनी Omicron च्या साथीचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे. ब्रिटनमध्ये सध्या रुग्णदुपटीचा वेग दोन-तीन दिवसांवर आल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आहे.

लंडन, 13 डिसेंबर: गेल्या दीड वर्षापासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूपासून (Coronavirus) सुटका होण्याची चिन्हे अद्याप दिसत नाहीत. लसीकरणामुळे (vaccination) या विषाणूच्या संसर्गाचा धोका आणि वेग कमी झाल्याने सगळ्या जगाला नुकताच दिलासा मिळत असतानाच, या विषाणूच्या ओमिक्रॉन (Omicron) या नवीन प्रकाराने पुन्हा एकदा धोक्याची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर निर्माण केली आहे. कोरोना विषाणूचा ओमिक्रॉन हा नवीन प्रकार धोकादायक ठरण्याचा इशारा संशोधकांनी दिला आहे. इंग्लंडमध्ये (England-UK) या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर तिथे करण्यात आलेल्या एका संशोधनानंतर हा विषाणू इंग्लंडमध्ये पुन्हा नवीन लाट निर्माण करू शकतो आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी एका बूस्टर डोसची गरज असल्याचं मत संशोधकांनी व्यक्त केलं आहे.

संशोधकांचा इशारा

आयएएनएसच्या (IANS) बातमीनुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (LSSTM) आणि दक्षिण आफ्रिकेतल्या (South Africa) स्टेलनबोश विद्यापीठाच्या संशोधकांनी इंग्लंड सरकारला इशारा दिला आहे, की देशात कठोर उपाययोजना (Strigent Regulations) केल्या नाहीत तर येत्या 5 महिन्यांत म्हणजे एप्रिल 2022पर्यंत इंग्लंडमध्ये 25 हजार ते 75 हजार नागरिकांचा मृत्यू (Deaths) होऊ शकतो. इतर देशांच्या तुलनेत इंग्लंडमध्ये या विषाणूचा संसर्ग अत्यंत वेगाने वाढत असून, तिथे दररोज 600 हून अधिक रुग्ण आढळत आहेत. 11 डिसेंबरला इंग्लंडमध्ये 54 हजार 73नवीन रुग्ण आढळले. त्यात 633 ओमिक्रॉनग्रस्त होते. हे प्रमाण यापेक्षा जास्त असू शकतं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस (Booster Dose) घेतल्यास ओमिक्रॉनचा प्रभाव कमी होणं शक्य होईल. बूस्टर डोस घेतल्यानंतर रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागण्याची शक्यता 60 टक्के असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'

अभिनेत्री करीना कपूर कोरोना पॉझिटिव्ह, बॉलिवूडकरांना पार्ट्या भोवणार?

दक्षिण आफ्रिकेत प्रथम आढळलेल्या ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असल्यानं वेळीच कठोर सुरक्षा उपायांची अंमलबजावणी न केल्यास कोविड-19 या आजाराचा प्रादुर्भाव अधिक वेगानं होईल आणि अल्फा प्रकारापेक्षा (Alfa Variant) याचे रुग्ण वाढतील असं संशोधकांनी आपल्या अभ्यास अहवालात नमूद केलं आहे.

रुग्णदुपटीचा कालावधी कमी

युरोपात याचा वेगाने फैलाव होत असून, इंग्लंड आणि डेन्मार्कमध्ये याचा प्रादुर्भाव अधिक झाल्याचं आढळलं आहे. याची लक्षणं डेल्टा प्रकारापेक्षा (Delta Varinat) सौम्य असल्याचं आढळलं असून, यामुळे रुग्णाची स्थिती गंभीर होण्याचं प्रमाण किती असेल याचा अद्याप अंदाज वर्तवणं कठीण असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे; मात्र यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यानं रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असू शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

दातदुखीमुळे झालं Omicron व्हेरिएंटचं निदान; पिंपरी चिंचवडमधील कुटुंबाला लागण

त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये (Children) याचा संसर्ग अधिक होत असल्याचा निष्कर्ष इंग्लंडमधल्या तज्ज्ञांनी नोंदवला असून, त्यांच्यामध्ये मध्यम ते गंभीर लक्षणंदेखील आढळत आहेत. त्यामुळे लहान मुलांना ऑक्सिजनवर ठेवण्याची, तसंच अधिक दिवस रुग्णालयात ठेवण्याची गरज भासत असल्याचं तज्ज्ञांनी नमूद केलं आहे. कोरोनाच्या यापूर्वीच्या विषाणूची लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण अत्यल्प होतं. त्यामुळे ओमिक्रॉनचा वाढता संसर्ग धोकादायक ठरू शकतो, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतल्या डॉक्टर्सच्या मते, ओमिक्रॉनची लक्षणं प्रत्येकात वेगवेगळी असू शकतात. तरुणांमध्ये (youth) अधिक थकवा, अंगदुखी, डोकेदुखी अशी लक्षणं दिसत आहेत, तर मुलांमध्ये ताप, सतत खोकला येणं, घशात खवखव, भूक न लागणं अशी लक्षणं दिसत आहेत. हा विषाणू लहान मुलांसाठी घातक ठरण्याची शक्यता असून, जगभरात यामुळे कोरोना विषाणूच्या संसर्गाची मोठी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WHO चा इशारा

जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील (WHO) र्व देशांना धोक्याचा इशारा दिला आहे. हा विषाणू लशीचा प्रभावदेखील कमी करू शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. सध्या या विषाणूमुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याचं प्रमाण कमी आहे; मात्र सौम्य किंवा कसलीही लक्षणं न दिसणं यामुळे याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरण्याचा धोका अधिक आहे आणि संसर्ग अधिक वाढला तर डेल्टापेक्षाही याचं प्रमाण अधिक व्यापक होऊ शकते आणि तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशारा आरोग्य संघटनेनं दिला आहे. त्यामुळे वेळीच कठोर उपाययोजना करून याचा प्रसार रोखणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्याकडे वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे.

Omicron Update: Corona च्या 'या' दोन लसी देतात 'कमी संरक्षण'- स्टडी

आपल्या देशातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असून, आतापर्यंत 38 रुग्ण आढळले आहेत. अनेक राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये याचा प्रसार झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेणं महत्त्वाचं आहे. सध्या तरी लसीकरण हाच प्रभावी उपाय असल्यानं सर्वांनी लसीकरण करून घेणं अत्यावश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

First published:

Tags: Coronavirus, Uk corona variant, United kingdom