मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Omicron Variant | ओमिक्रॉन व्हेरिएंट वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

Omicron Variant | ओमिक्रॉन व्हेरिएंट वर्षापूर्वीपासूनच अस्तित्वात? शास्त्रज्ञांच्या दाव्याने खळबळ

कोरोनाव्हायरसच्या (Coronavirus) ओमिक्रॉन प्रकाराच्या (Omicron Variant) उत्पत्तीबाबत अनेक अभ्यासांमध्ये वेगवेगळी मते समोर येत आहेत. त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक शास्त्रज्ञ म्हणतात की ओमिक्रॉनमध्ये असलेल्या म्यूटेशनच्या (Mutation) पातळीवरून असे दिसते की ते अलीकडेच विकसित झाले नसावे. काही शास्त्रज्ञांना जुन्या बीटा आणि डेल्टा प्रकारांची समानता यात दिसून आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Rahul Punde

मुंबई, 13 डिसेंबर : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराचा (Omicron Variant) जलद प्रसार आणि लसीपासून बचाव करण्याच्या क्षमतेवर संशोधन केलं जात आहे. यासाठी शास्त्रज्ञ अजूनही या प्रकाराच्या म्यूटेशनची (Mutation) उत्पत्ती, त्याचा परिणाम इत्यादींचा अभ्यास करत आहेत. आतापर्यंत या प्रकाराच्या उत्पत्तीबद्दल (Origin of Omicron) अनेक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्याची तपासणी केली जात आहे. म्यूटेशनद्वारे ओमिक्रॉनला या पातळीपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो, त्यामुळे त्याची उत्पत्ती फार पूर्वी झाली असावी, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

मागच्या महिन्यात शोध

ओमिक्रॉन प्रकार गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रकाशात आला जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेत आढळल्याची नोंद झाली, जिथे लसीकरण पुरेसे झालेलं नाही. आतापर्यंत तो 60 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यावर मात करण्यासाठी त्याला पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे.

जुन्या व्हेरिएंटसारखे गुणधर्म

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आतापर्यंतच्या अभ्यासात ओमिक्रॉनच्या अनुवांशिक गुणधर्मांमध्ये गेल्या वर्षभरात पसरत असलेल्या अनेक व्हेरिएंटच्या गुणधर्मांमध्ये समानता दिसून आली आहे. फायनान्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ओमिक्रॉन व्हेरिएंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटसोबत अधिक समान आहे.

एक वर्षापूर्वीपासून अस्तित्व?

संपूर्ण म्यूटेशन स्वतःच कसं विकसित झालं? या प्रश्नात व्हेरिएंटचे रहस्य असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील स्ट्रक्चरल बायोलॉजिस्ट प्रोफेसर डेव्हिड स्टुअर्ट यांनी सांगितले. ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील उत्क्रांती जीवशास्त्राच्या प्राध्यापिका साराह ओट्टो म्हणतात की असे दिसते की हा व्हेरिएंट एक वर्षापूर्वीपासून अस्तित्वात होता.

दातदुखीमुळे झालं Omicron व्हेरिएंटचं निदान; पिंपरी चिंचवडमधील कुटुंबाला लागण

वेगवेगळी मतं

या कोड्याच्या गोंधळाचे कारण अनेक सिद्धांत आहेत जसे की विषाणूची उत्पत्ती एचआयव्ही बाधित व्यक्तीपासून झाली आहे, अँटी-कोविड औषधांनी त्याचा विकास वेगवान केला आहे, तो प्राण्यांपर्यंत पोहोचला आहे आणि नंतर तो मनुष्यापर्यंत परत आला आहे. डर्बनमधील क्वाजुला-नॅटल विद्यापीठातील संसर्गजन्य रोग चिकित्सक रिचर्ड लॅसेलेस म्हणतात की ओमिक्रॉनची मुळे कुठेतरी दक्षिण आफ्रिकेत आहेत.

म्यूटेशन होण्याचे वेगळे संकेत

गेल्यावर्षी दक्षिण आफ्रिकेच्या संशोधन पथकाने एका एचआयव्ही-संक्रमित रुग्णाचा शोध लावला जो सहा महिन्यांपासून कोविड-19 ने त्रस्त होता. टीमला असे आढळले की या व्यक्तीमध्ये असे म्यूटेशन होते ज्यामुळे स्पाइक प्रोटीनवर परिणाम होऊ शकतो. ब्रिटनमधील एका ब्लड कॅन्सर रुग्णामध्ये अशीच लक्षणे आढळून आल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे.

नगरमध्ये ओमिक्रॉनचा धोका वाढला; हाय रिस्क देशातून 86 प्रवाशी जिल्ह्यात दाखल

एचआयव्ही रुग्णामध्ये विषाणूचे म्यूटेशन?

एखादा असा एचआयव्हीचा रुग्ण ज्याच्यावर उपचार केले गेले नाहीत, परिणामी त्याची रोगप्रतिकारक शक्ती विषाणू नष्ट करू शकली नाही. पण, विषाणूची म्यूटेशनची प्रक्रिया सुरूच राहिली असावी. अशा प्रकारे उत्क्रांतीची प्रक्रिया अत्यंत दुर्मिळ असते. मात्र, हे ओमिक्रॉनच्या उत्पत्तीचे संभाव्य कारण असू शकते, असं लेसेल्स यांनी स्पष्ट केलंय.

शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली की बीटा आणि डेल्टा व्हेरिएंट देखील दक्षिण आफ्रिकेतूनच आले होते. जिथे एचआयव्ही संसर्गामुळे रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झालेले अनेक लोकं आहेत. त्याचवेळी, एखाद्या औषधामुळेही म्यूटेशन किंवा मानवाकडून प्राण्याकडे आणि नंतर मानवाकडे आलेल्या धारणेला फारसे महत्त्व दिले जात नाही. मात्र, असं होण्याची शक्यताही आहे.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona updates