Home /News /coronavirus-latest-news /

...तरच भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्डच्या लशीला मिळू शकते परवानगी

...तरच भारतामध्ये आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफर्डच्या लशीला मिळू शकते परवानगी

जगभरात विविध लशींवर (Vaccine) संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील पुढील महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून विविध लसींचे भारतात उत्पादन आणि चाचण्या सुरु आहेत.

    नवी दिल्ली, 29 डिसेंबर: जगभरात विविध लशींवर (Vaccine) संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. भारतात देखील पुढील महिन्यात लस उपलब्ध होण्याची शक्यता असून विविध लसींचे भारतात उत्पादन आणि चाचण्या सुरु आहेत. यामध्ये सिरम इन्स्टिट्यूटची (SII) लस पुढील महिन्यात बाजारात येण्याची अपेक्षा आहे. परंतु भारतीय औषध नियामक प्राधिकरण (DCGI) ब्रिटनमधील ऑक्सफर्डच्या रिपोर्टची वाट पाहत असून पुढील महिन्यात त्यांचा रिपोर्ट येण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपात्कालीन वापरासाठी भारत सरकार सिरममध्ये तयार होणाऱ्या लसीचा वापर करू शकणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यूके ड्रग रेग्युलेटरने ऑक्सफर्डच्या लसीला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था (Central Drugs Standard Control Organization) COVID-19 विशेषज्ञ समितीची बैठक आयोजित करेल. या बैठकीत लसीला मंजुरी देण्यापूर्वी भारतात आणि परदेशात करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलमधील सुरक्षा आणि इम्यूनोजेनिसिटी डेटाचा सखोल आढावा घेतला जाईल. सध्या भारतात सिरममध्ये (SII) लसीचे डोस तयार करण्याचे काम सुरु असून भारत बायोटेकमध्ये देखील Covaxin च्या चाचण्या सुरु आहेत. या लसीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळण्यास खूप उशीर लागू शकतो. या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु असून याचा डेटा येण्यास खूप वेळ लागू शकतो. त्याचबरोबर फायझरने (Pfizer) देखील भारतात अजूनपर्यंत प्रेझेन्टेशन दिलेलं नाही. त्यामुळे भारतात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होत असलेल्या ऑक्सफर्डच्या 'Covishield' या लसीला सर्वात आधी परवानगी मिळू शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे. (हे वाचा-नवा कोरोना नवी लक्षण! झपाट्याने रुग्ण वाढण्याची भीती, नवा स्ट्रेन अधिक धोकादायक) फायझर कंपनीच्या लसीला विविध देशांमध्ये वापरासाठी परवानगी देण्यात आली असून अमेरिका, ब्रिटन आणि बहरीनमध्ये  फायझर (Pfizer) कंपनीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) सध्या भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) आणि फायजर(Pfizer) या कंपन्यांनी केलेल्या विनंती अर्जांची तपासणी करत आहे. या कंपन्यांच्या कोरोनावरील लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी देता येईल. अर्थात DCGI ने होकार दिल्यानंतरच भारतात कोरोना लशीच्या आपात्कालीन वापराला परवानगी मिळेल. DGCI ने या कंपन्यांकडून लसीबाबतचा अधिक डेटा मागितला असल्याची माहिती मागील आठवड्यात समोर आली होती.  शिवाय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला आहे. असे असले तरी त्याचा लस मिळण्याच्या वेळेवर कोणताही परिणाम होणार नाही, असं अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. (हे वाचा-हा प्रसिद्ध अभिनेता कोरोना पॉझिटिव्ह, शुक्रवारी केली होती ख्रिसमस पार्टी) सिरमने कोरोना लस तयार करण्यासाठी ब्रिटनमधील ऑक्सफर्ड आणि AstraZeneca यांच्याबरोबर करार केला असून भारतात लसीच्या उत्पादनाला देखील सुरुवात केली आहे. आतापर्यंत लसीचे 4 कोटी डोस देखील त्यांनी तयार केले आहेत. कोरोनाचा नवीन विषाणू समोर आल्यानंतर भारत सरकारने सध्याच्या लसीच्या परिणामावर शंका उपस्थित केली होती. त्यानंतर सिरमने त्यांच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा काही डेटा केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेला (DCGI) सादर केला आहे. त्याचबरोबर या नवीन विषाणूमुळे या निर्माण होणाऱ्या लसीचा परिणाम कमी होणार नसल्याचे देखील कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. भारत बायोटेकच्या Covaxin च्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचा रिपोर्ट देखील एसईसीने मागवला असून यावर देखील विचार सुरु आहे. (हे वाचा-भारतात शिरला नवा कोरोना, ब्रिटनमधून परतलेले 6 जण पॉझिटिव्ह दरम्यान, सीरमच्या (SII) या विंनती अर्जावर विचार करताना एसईसीने सिरमला  दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांचा अद्ययावत सुरक्षा डेटा सादर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर भारतातील आणि ब्रिटनमधील क्लिनिकल चाचणीचा इम्यूनोजेसिटी डेटा देखील सादर करण्याची मागणी केली आहे. ब्रिटन मेडिसीन्स आणि हेल्थकेअर उत्पादने नियामक एजन्सीची परवानगी देखील सादर करण्याची मागणी केली आहे. त्यामुळं आता पुढील महिन्यात याच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी याकडे सर्व  लक्ष लागून आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india

    पुढील बातम्या